विद्युत अभियंत्याने पकडले वीजचोरटे

By Admin | Updated: August 9, 2014 00:05 IST2014-08-08T23:44:23+5:302014-08-09T00:05:09+5:30

लोणार तालुक्यातील बिबी येथील विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी ७ वीज चोरट्यांना पकडले.

Electrical engineers caught power tariffs | विद्युत अभियंत्याने पकडले वीजचोरटे

विद्युत अभियंत्याने पकडले वीजचोरटे

चोरपांग्रा : लोणार तालुक्यातील बिबी येथील विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी ७ वीज चोरट्यांना पकडले असून, यामुळे वीज चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.
बिबी येथील विद्युत वितरण कंपनीचे अभियंता ए.वाय.ठमके यांना परिसरात वीज चोरी सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावर अभियंत्यांनी बिबीसह परिसरात वीज चोरी पकडण्यास सुरुवात केली. तेव्हा ८ ऑगस्ट रोजी त्यांना ७ वीजचोर पकडण्यात यश आले. विद्युत अभियंता ए.वाय.ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरट्यास दंड आकारण्यात आला असून, त्यांनी येत्या ३ दिवसात दंड न भरल्यास त्यांच्यावर पोलिस कारवाई करण्यात येणार आहे. या वीज चोरीच्या सत्रामुळे विद्युत रोहित्रात बिघाड होऊन परिसरातील लोकांना अंधारात राहण्याची वेळ येते. त्याचबरोबर वीज वितरण कंपनीचेही मोठे नुकसान होते.
विद्युत अभियंत्यांनी कंबर कसून वीज चोरट्यांना पकडण्यास सुरुवात केल्याने वीज चोटर्‍यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Electrical engineers caught power tariffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.