ईश्वरचिठ्ठीने तीन सदस्यांची निवड मतमोजणी
By Admin | Updated: August 7, 2015 01:03 IST2015-08-07T01:03:06+5:302015-08-07T01:03:06+5:30
परिसरास यात्रेचे स्वरूप; फटाक्यांची आतषबाजी.

ईश्वरचिठ्ठीने तीन सदस्यांची निवड मतमोजणी
मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींच्या ३७४ जागेसाठी ४ आॅगस्ट रोजी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आज ६ आॅगस्ट रोजी तालुकास्तरावर मतमोजणी प्रक्रिया पार पडली. तहसील परिसरात सुरू झालेली ४६ ग्रा. पं. ची मतमोजणी दुपारपर्यंत आटोपली. ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी शहरात प्रचंड जल्लोष केला. विषेश म्हणजे तालुक्यातील सारोळा मारोती, इब्राहिमपूर व वरूड ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी दोन अशा सहा सदस्यांना सारखीच मते पडल्यामुळे ईश्वर चिठठ्ीने या ठिकाणी एका-एका सदस्यांचे भाग्य उजळले. यामध्ये सारोळा मारोती येथील प्रभाग दोनमध्ये अनिता सुखदेव शिपालकर व सुनिता भगावान आसणे या दोघांना २५० मते पडली होती. ईश्वर चिठठ्ीमध्ये अनिता शिपालकर भाग्यवान ठरल्या. इब्राहिमपूर ग्रा. पं.मध्ये मंदा कैलास हरमकार व यमुनाबाई वाघ या दोघांना १२७ मते पडली होती. या ठिकाणी ईश्वर चिठठ्ीने मंदा हरमकार भाग्यवान ठरल्या तर वरूड ग्रा.पं. मध्ये अन्नपूर्णा महादेव जुनारे व मुक्ता राजेंद्र देठे या दोघांना १४५ मते पडली होती. या ठिकाणी मुक्ता देठे या भाग्यवान ठरल्या.