देऊळगाव राजात दाेन टप्प्यात हाेणार निवडणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:35 IST2021-02-05T08:35:13+5:302021-02-05T08:35:13+5:30

देऊळगाव राजा : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंचपदासाठी निवडणुकीचा मुहूर्त अखेर प्रशासनाने जाहीर केला आहे, १० फेब्रुवारीला ...

Elections will be held in Deulgaon Raja in the right phase | देऊळगाव राजात दाेन टप्प्यात हाेणार निवडणुक

देऊळगाव राजात दाेन टप्प्यात हाेणार निवडणुक

देऊळगाव राजा : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंचपदासाठी निवडणुकीचा मुहूर्त अखेर प्रशासनाने जाहीर केला आहे, १० फेब्रुवारीला १५ ग्रामपंचायत तर ११ फेब्रुवारीला ११ अशा दोन टप्प्यात २६ ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच पदासाठी निवडणुका घेण्यात येणार आहे.

१० फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात अंढेरा,गिरोली खुर्द, पळसखेड झाल्टा,तुळजापूर, चिंचोली बामखेड, मंडपगाव, पिंपळगाव बुद्रुक, मेहुणा राजा, उंबरखेड, सावखेड नागरे, नागनगाव,डोढरा, पांगरी वाडी, आळंद,पाडळी शिंदे, तर ११ फेब्रुवारी राेजी शिवणी आरमाळ, बायगाव बुद्रुक, देऊळगाव मही, जवळखेड, मेंडगाव, निमगाव गुरु, टाकरखेड वायाळ, बोराखेडी बावरा, सावखेड भोई, पिंप्री आंधळे, खल्याळ गव्हाण या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड हाेणार आहे. २६ ग्रामपंचायतीमध्ये बहुतांश ठिकाणी स्पष्ट बहुमत असल्याने सरपंच निवडीचा मार्ग सुकर झालेला असला तरी अनेक ठिकाणी बहुमत काठावर आलेले असल्याने सरपंच उपसरपंच पदासाठी सस्पेन्स मात्र अद्यापही कायम आहे. तालुक्यातील काही ग्रामपंचायतमध्ये पॅनेलला मतदारांनी स्पष्ट बहुमत नाकारल्याने संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अशा ग्रामपंचायत बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. जवळपास सर्वच ग्रामपंचायतचे निवडून आलेले सदस्य खबरदारीचा उपाय म्हणून देवदर्शनासाठी सहलीवर रवाना झाले आहेत. गावाचा कारभारी ठरवण्यासाठी सर्वच गटतट अपेक्षा बाळगून असले तरी वेळेवर काय घडते याची खात्री कुणालाच नाही. तालुक्यातील २६ गावांमध्ये सध्या सरपंच उपसरपंच निवडणुकीची चर्चा ऐरणीवर असुन आरक्षण सुटलेल्या सरपंच पदासाठी निवडून आलेले अनेक उमेदवार पात्र आहेत. मतदानापूर्वी दिलेले शब्द पाळल्या गेले तर निवडणूक सहज पार पडेल. मात्र वेळेवर शब्द फिरवल्या गेले तर नाट्यमय घडामोडी घडून अनपेक्षितपणे सरपंच उपसरपंच पदाची लॉटरी अपेक्षा नसतांना सुद्धा अनेकांच्या नशिबी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Web Title: Elections will be held in Deulgaon Raja in the right phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.