जिल्ह्यात विषय समिती सभापती निवडणूक शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:31 IST2021-01-22T04:31:32+5:302021-01-22T04:31:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यातील बुलडाणा पालिकेसह घाटावरील चार तर घाटाखालील पाच अशा एकूण नऊ नगरपालिकांमध्ये गुरुवारी विषय ...

जिल्ह्यात विषय समिती सभापती निवडणूक शांततेत
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील बुलडाणा पालिकेसह घाटावरील चार तर घाटाखालील पाच अशा एकूण नऊ नगरपालिकांमध्ये गुरुवारी विषय समिती निवडणूक शांततेत पार पडली. यामध्ये बुलडाणा पालिकेवर महाविकास आघाडीचे तर खामगाव पालिकेवर भाजपचे वर्चस्व दिसून आले. मेहकर पालिकेत शिवसेना तर नांदुरा पालिकेत महाविकास परिवर्तन पॅनलचे प्राबल्य दिसले. बुलडाणा पालिकेतील विषय समिती निवडणूक शिक्षण सभापतींच्या तातडीच्या नाराजीनामा नाट्यामुळे चर्चेत आली.
जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, मेहकर, देऊळगावराजा, खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद, शेगाव आणि नांदुरा पालिकेत गुरुवारी विषय समिती निवडणूक प्रक्रिया पार पडली.
-बुलडाणा पालिकेत आघाडीचा माहोल
-बुलडाणा पालिकेत अविरोध पार पडलेल्या विषय समिती निवडणुकीत बांधकाम सभापतिपदी काँग्रेसचे मो. अफसर मो. सरवर, पाणीपुरवठा सभापतिपदी कोमल आतीश बेंडवाल (शिवसेना), आरोग्य सभापती आशीष जाधव (शिवसेना), शिक्षण गौसीया बी सत्तार कुरेशी, महिला व बालकल्याण सभापती राणी बी शे.लाल, नियोजन समिती सभापतिपदी विजय जायभाये यांची वर्णी लागली. स्थायी समितीत शिवसेनेच्या उमेश रत्नाकर कापुरे, दीपक दशरथ सोनोने यांची निवड झाली.
मेहकर पालिकेत सेना- काँग्रेसचे वर्चस्व
- स्थानिक नगरपालिकेत गुरुवारी विषय समिती निवडणूक अविरोध पार पडली. यामध्ये बांधकाम सभापतिपदी जयचंद भाटिया, नियोजन विकास समिती सभापती तोफिक कुरेशी, आरोग्य समिती सभापती हलिमाबी हनीफ गवळी, शिक्षण समिती सभापती शारदा समाधान सास्ते, पाणीपुरवठा समिती सभापती दीपिका रवी रहाटे, महिला व बालकल्याण समिती सभापती खुर्शीदबी वली मोहम्मद अविरोध निवडून आले. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गणेश राठोड उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्याधिकारी सचिन गाडे, नगराध्यक्ष हाजी कासम गवळी, दिलीप गायकवाड, पवन भादुपोता आदींनी सहकार्य केले.
----------
खामगावात भाजपचा वरचष्मा
खामगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खामगाव नगरपालिकेतील विषय समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा दिसून आला. गुरुवारी पार पडलेल्या विषय समिती निवडणुकीत बांधकाम सभापती सीमा वानखडे, आरोग्य सभापती ओमप्रकाश शर्मा, शिक्षण सभापती हिरालाल बोर्डे, महिला व बालविकास सभापती शिवानी कुळकर्णी, उपसभापती भाग्यश्री मानकर, पाणीपुरवठा सभापतिपदी जकिया बानो शेख अनिस यांची निवड करण्यात आली. तर स्थायी समिती सदस्य म्हणून भाजपच्या सौ. संतोष पुरोहित, सौ. रेखा गणेश जाधव यांची अविरोध निवड झाली. स्थायी समितीवर काँग्रेसकडून अ. रशीद अ. लतीफ यांना संधी देण्यात आली.
-
शेगाव पालिकेत भाजपचे प्राबल्य
- स्थानिक नगरपालिकेतील विषय समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य दिसून आले. शेगाव पालिकेच्या आरोग्य सभापतिपदी मंगलाताई कमलाकर चव्हाण, आरोग्य सभापतिपदी पवन शर्मा, शिक्षण सभापतिपदी शैलेश डाबेराव, बांधकाम सभापतिपदी राजेंद्र कलोरे यांची तर महिला व बालकल्याण सभापतिपदी मालाताई देशमुख यांची निवड झाली. स्थायी समिती सदस्य म्हणून प्रीती शेगोकार, गंगूबाई खंडारे, अलका खानझाडे यांची वर्णी लागली.
- जळगाव जामोदमध्ये निवडणूक अविरोध
- जळगाव जामोद पालिकेत गुरुवारी विषय समिती निवडणूक अविरोध पार पडली. यामध्ये बांधकाम सभापतिपदी सविता अनिल कपले, आरोग्य सभापती मांगीलाल खेमराज भंसाली, शिक्षण सभापती रमेश मारुती ताडे, महिला व बालकल्याण समिती उषाताई नानाराव धंदर, पाणीपुरवठा समिती सभापती सविता शरद खवणे तर नियोजन समिती सभापतिपदी आशीष राजेंद्र सारसर यांची निवड झाली.
-----------
नांदुरा पालिकेत एकडे पॅनलचे वर्चस्व
- येथील नगरपालिका विषय समिती निवडणुकीत आमदार राजेश एकडे प्रणीत महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले. यामध्ये बांधकाम सभापतिपदी शुभांगी कोलते, शिक्षण सभापती शमिनाखान मोहतेशम रजा, आरोग्य सभापती संजय टाकळकर, पाणीपुरवठा सभापती अजय घनोकार, महिला व बालकल्याण सभापतिपदी नसीमबानो शेख मुक्तारसेठ, उपसभापती गायत्री गोकुळ खेळे, नियोजन निवृत्ती इंगळे, स्थायी समिती सदस्य म्हणून रजनी अनिल जवरे, शुभांगी कोलते, शमिनाबी मोहतेशम रजा, अजय घनोकार, नसीमबानो शे. मुक्तार, अनंता भारंबे, गायत्री खेळकर, संगीता कोलते, प्रमोद गायकवाड यांची निवड झाली.
-
मलकापूर पालिकेत काँग्रेसचा बोलबाला
- मलकापूर पालिकेतील विषय समिती निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व असून बांधकाम सभापतिपदी पूजा गोपाल राठी, शिक्षण सभापती रशीदखां युसूफखां जमादार, आरोग्य समिती सभापती मो. जाकीर मो. इलियास, पाणीपुरवठा सभापतिपदी अनिल गांधी, नियोजन समिती सभापतिपदी सलमा बानो शे. इम्रान, महिला व बालकल्याण सभापतिपदी छाया शंकर पाटील यांची निवड झाली. स्थायी समितीत राजेंद्र वाडेकर, सनाउल्लाखां रफीउल्लाखां, मंगला श्रीकृष्ण पाटील यांची वर्णी लागली.