निवडणूक रणधुमाळी थांबली; उद्या मतदान

By Admin | Updated: August 3, 2015 01:39 IST2015-08-03T01:39:14+5:302015-08-03T01:39:14+5:30

शासकीय यंत्रणा सज्ज; ‘मनी’ आणि ‘मसल पॉवर’चा होऊ शकतो वापर.

Election rally stopped; Voting tomorrow | निवडणूक रणधुमाळी थांबली; उद्या मतदान

निवडणूक रणधुमाळी थांबली; उद्या मतदान

बुलडाणा : मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींच्या प्रचाराची रणधुमाळी रविवार, २ ऑगस्ट रोजी संपत आहे. मंगळवारी होणार्‍या मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस ग्रामीण भागात राजकीय वातावरण कमालीचे तापणार असून, ह्यमनीह्ण आणि ह्यमसल पॉवरह्णचा मोठय़ा प्रमाणावर वापर होणार असल्याने पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ५२१ ग्रामपंचायतींसाठी १४ हजार १0 उमेदवार रिंगणात असून, मागील एक आठवड्यापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. एका-एका मतासाठी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते प्रयत्नाची पराकाष्ठा करीत असल्याचे दिसत होते. ग्रामपंचायतीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या या निवडणुकामध्ये साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला जात आहे. बुलडाणा तालुक्यात सागवन, देऊळघाट, धाड, चांडोळ, रुईखेड टेकाळे, साखळी या मोठय़ा ग्रमापंचायतींमध्ये प्रतिष्ठेची लढत होत आहे. येत्या दोन दिवसां त वातावरण तणावाचे राहणार आहे.

Web Title: Election rally stopped; Voting tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.