प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक अविरोध
By Admin | Updated: February 14, 2015 01:48 IST2015-02-14T01:48:27+5:302015-02-14T01:48:27+5:30
मोताळा तालुक्यातील १५ जागांसाठी १६ उमेदवारांनी केले होते नामांकन.

प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक अविरोध
मोताळा (जि. बुलडाणा) : शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महिला राखीव गटातून कल्पना अशोक लांजुळकर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने मोताळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक अविरोध झाली. मोताळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर एकूण १५ जागेसाठी १६ अर्ज दाखल झाले होते. यामध्ये दोन महिला राखीव पदासाठी कल्पना अशोक लांजुळकर, संगीता हुकुमचंद टावरी व राजङ्म्री बाळकृष्ण महाजन यांचे तीन अर्ज दाखल झाले होते. तर १0 सर्व साधारण जागेसाठी १0 अर्ज, अनुसूचित जातीसाठी १ अर्ज, विशेष मागासप्र्वगासाठी १ अर्ज, इ.मा. व. मधून १ अर्ज, दाखल झाल्यामुळे यातील १३ जणांची अविरोध निवड होणार होती; परंतु महिला राखीव गटातून तीन अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अविरोध होते की नाही, याकडे सर्वांंचे लक्ष लागले होते. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी कल्पना लांजुळकर यांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक अविरोध झाली.