मोकाट बैलाने धडक दिल्याने वृध्द महिला गंभीर जखमी, बुलढाण्यातील घटना
By अनिल गवई | Updated: July 4, 2024 19:47 IST2024-07-04T19:46:54+5:302024-07-04T19:47:03+5:30
मोकाट बैलाने धडक दिल्याने वृध्द महिला गंभीर जखमी झाली.

मोकाट बैलाने धडक दिल्याने वृध्द महिला गंभीर जखमी, बुलढाण्यातील घटना
खामगाव : मोकाट बैलाने धडक दिल्याने वृध्द महिला गंभीर जखमी झाली. सिव्हील लाइन भागातील श्रीराम नगरात गुरूवारी सकाळी ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, श्रीराम नगरातील मिनाक्षी वैद्य सकाळी घरासमोर झाडत होत्या. त्यावेळी धावत आलेल्या एका मोकाट बैलाने त्यांना जबर धडक दिली. यात डोक्यावर पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून पाठीचा मणका देखील क्षतीग्रस्त झाला आहे.
त्यामुळे त्यांना तातडीने खामगाव येथील खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले. शहरातील मोकाट जनावरांकडे नगर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मुख्य रस्ते तसेच गल्लीबोळीत मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. याकडे नगर पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.