शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

घारोड येथे नाल्याच्या पुलावरून वृद्ध वाहून गेला, पुतण्या पोहता येत असल्याने बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:37 IST

ही घटना मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

खामगाव: तालुक्यातील घारोड (ता. खामगाव) येथील धोंडूजी भगवान इंगळे ( ७०) हे आपला पुतण्या राहुल मधुकर इंगळे याच्यासोबत शेतावरून मोटारसायकलवरून घरी येत असताना घारोड अकोली मार्गावरील नाल्याच्या पुलावरून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. ही घटना मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, पुराच्या पाण्याचा जोर अधिक असल्याने मोटारसायकल वरील नियंत्रण सुटले आणि दोघेही पाण्यात पडले. यावेळी राहुल इंगळे यास पोहता येत असल्याने त्याने कसाबसा जीव वाचवला. मात्र, धोंडूजी इंगळे यांना पोहता येत नसल्याने ते वाहून गेले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांसह हिवरखेड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली आहे. घटनास्थळी मोटारसायकल आणि इंगळे यांचे धोतर सापडले आहे, मात्र अद्यापपर्यंत त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. अतिवृष्टीमुळे नाल्यांना आलेल्या पुराचा अंदाज न घेता वाहतुकीचा प्रयत्न केल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने अशा परिस्थितीत पुलांवरील वाहतूक टाळण्याचे आवाहन केले आहे.

शोधमोहीमेसाठी प्रशासन सतर्क; एसडीआरएफ विभागाला कळवलेया घटनेची माहिती खामगावचे तहसीलदार सुनील पाटील तसेच बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील एसडीआरएफ विभागाचे संभाजी पवार यांना कळविण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर हिवरखेड पोलिस ठाण्याचे पीआय चौधरी, तलाठी आणि गाव प्रशासनाच्या वतीने शोधमोहीम सुरू आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या धोंडूजी इंगळे यांचा तपास घेण्यासाठी संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक ती कार्यवाही तात्काळ राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.इंगळे यांच्या घरी शोककळा; ग्रामस्थांकडून शोधकार्याला हातभार -धोंडूजी इंगळे यांच्या घरात रात्रीपासूनच शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांची अवस्था अत्यंत वेदनादायक असून, गावकऱ्यांनी देखील शोधकार्याला सक्रिय पाठिंबा दिला आहे. नदीकाठ, झाडी, व नाल्याच्या परिसरात ग्रामस्थ व प्रशासन मिळून सतत शोध घेत आहेत. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेPoliceपोलिस