जिल्ह्यात आठजण पॉझिटिव्ह; तिघांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:36 IST2021-08-26T04:36:49+5:302021-08-26T04:36:49+5:30
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण दोन हजार १०७ जणांचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यापैकी दोन हजार ९९ जणांचे अहवाल ...

जिल्ह्यात आठजण पॉझिटिव्ह; तिघांची कोरोनावर मात
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण दोन हजार १०७ जणांचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यापैकी दोन हजार ९९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये देऊळगाव राजा शहरातील बालाजीनगरमधील एक, बुलडाणा शहरातील एक, चिखली तालुक्यातील ब्रह्मपूरवाडी येथील एक, हिवरखेड येथील एक, मेरा बुद्रूक येथील दोन, चिखली शहरातील राऊतवाडीमधील एक, गजानन नगरमधील एकाचा समावेश आहे. तीन जणांनी बुधवारी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी सहा लाख ८२ हजार १६० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजपर्यंत ८६ हजार ६८४ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. अद्यापही एक हजार ५० संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची ८७ हजार ३८० झाली असून, त्यापैकी २४ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे ६७२ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.