आठ रुग्णांची काेराेनावर मात, नवीन एकही पाॅझिटिव्ह नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST2021-08-25T04:39:32+5:302021-08-25T04:39:32+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून मंगळवारी जिल्ह्यात एकाही रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आलेला नाही़ तसेच ८ ...

Eight patients overcame caries, no new positive | आठ रुग्णांची काेराेनावर मात, नवीन एकही पाॅझिटिव्ह नाही

आठ रुग्णांची काेराेनावर मात, नवीन एकही पाॅझिटिव्ह नाही

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून मंगळवारी जिल्ह्यात एकाही रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आलेला नाही़ तसेच ८ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे़

जिल्ह्यात कोरोना विषाणूने पूर्णपणे माघार घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आज चौथ्यांदा नवीन संसर्गग्रस्त रूग्णाने शून्य गाठला आहे. जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले १९ सक्रिय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनिटायझर करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रिसूत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे आजपर्यंत ६ लाख ८० हजार ६१ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ८६ हजार ६८१ कोरोना बाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी १३७९ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात आज अखेर एकूण ८७ हजार ३७२ कोरोना बाधित रूग्ण असून त्यापैकी ८६ हजार ६८१ कोरोना बाधित रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे १९ सक्रिय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत ६७२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे

Web Title: Eight patients overcame caries, no new positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.