शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘लम्पी’वरील लसीसाठी आठ दिवसांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 11:38 IST

लस खरेदीसाठी तीन लाख रुपयांची तरतूद जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आली आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील पाच तालुक्यातील १८९ गुरांना लम्पी या आजाराची लागण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये जालना, अकोला या जिल्ह्यातून लंम्पीचा शिरकाव झाला असून गुरांच्या खरेदी विक्रीतूनच याचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सध्या पशु संवर्धन विभागाकडे लसीचा तुटवडा आहे. लसीकरणासाठी आणखी आठ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लस खरेदीसाठी तीन लाख रुपयांची तरतूद जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आली आहे.राज्यात सध्या गुरांमध्ये लम्पी स्किन आजाराची लागण वाढत आहे. एका जिल्ह्यातूर दुसऱ्या जिल्ह्यात हा आजारा पसरत आहे. गेल्या महिन्यापासून बुलडाणा जिल्ह्यामध्ये या आजाराने पाय पसरविण्यास सुरूवात केली आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये अकोला व मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून काही पशुपालकांनी गाय व बैलांची खरेदी केली. त्यामुळे या गाय व बैलांसोबतच जिल्ह्यातही लम्पी आजार आला. लम्पी हा विषाणूजन्य साथीचा चर्मरोग असल्याने हळुहळू या आजाराचा फैलाव जिल्ह्यात पसरला आहे. सध्या जिल्ह्यातील चिखली, खामगाव, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा व मेहकर या पाच तालुक्यांमध्ये लम्पीचा आजार पसरला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यातील १८९ गुरे लम्पी आजाराने बाधित झाली आहेत. त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागाकडून तातडीने उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे गुरे बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. परंतू सध्या या गुरांना आवश्यक असलेल्या लसीचा तुटवडा असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून लसीची मागणी करण्यात आली आहे. तीन लाख रुपयांच्या लसी जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून खरेदी करण्यात येणार आहेत. आठ दिवसात ही लस जिल्ह्यात पोहचेल. तसे नियोजन पशु संवर्धन विभागाने केले आहे. जिल्ह्यात लम्पी स्किन आजार वाढतच असल्याने पशुपालकांनी धास्ती घेतली आहे. संसर्गजन्य आजार असल्याने इतर गुरांनाही त्याची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पशुपालकांनी गुरांचे गोठे स्वच्छ ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्केलम्पी आजाराची लागण झालेल्या १८९ गुरांपैकी १४९ गुरे आतापर्यंत बरे झाले आहेत. जिल्ह्यात एकाही गुराचा मृत्यू झालेला नाही. लम्पी स्कीन आजाराने गुरे बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के आहे, सर्व गुरांवर लवकरच लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुधन विकास अधिकारी डॉ. तृप्ती पाटील (खेडेकर) यांनी दिली.

गुरांच्या खरेदी विक्रीतून आपल्या जिल्ह्यात लम्पी आजार आला. पशुपालकांनी या आजाराला घाबरून न जाता आपल्या गुरांची योग्य ती काळजी घ्यावी. गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा. आजार उद्भवल्यास पशुसंवर्धन विभागाला माहिती द्यावी.-डॉ. की. मा. ठाकरे,पशुसंवर्धन अधिकारी बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा