खामगाव येथे ईद उत्साहात साजरी
By अनिल गवई | Updated: April 11, 2024 18:01 IST2024-04-11T18:00:02+5:302024-04-11T18:01:03+5:30
मुस्लिम समाज बांधवांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता सजनपुरी येथील इदगाहवर ईद उल फितरची नमाज अदा करून ईद मोठ्या उत्साहात साजरी केली.

खामगाव येथे ईद उत्साहात साजरी
अनिल गवई,खामगाव: मुस्लिम समाज बांधवांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता सजनपुरी येथील इदगाहवर ईद उल फितरची नमाज अदा करून ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी मस्तान चौकस्थित मशिदीचे पेश इमाम हाफिज सरफराज खान यांनी ईदच्या नमाजचे पठण केले. त्यानंतर शहर, तसेच देशात सुख-शांती आणि सद्भाव अबाधित राखण्यासाठी सामूहिक प्रार्थना केली. देशाच्या हितासाठी दुवा मागीतली.
याबाबत सविस्तर असे की, गत महिनाभरापासून मुस्लिम समाज बांधवांचे रोजे अर्थातच उपवास सुरू होते. बुधवारी चंद्र दिसल्यानंतर, गुरुवारी ईद साजरी होणार असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे शहरातील तमाम मुस्लिम समाज बांधवांमध्ये शुक्रवारी सकाळपासूनच चैतन्याचे वातावरण होते. सकाळी सामूहिक नमाज अदा केल्यानंतर, सर्व मुस्लिम समाज बांधव बर्डे प्लाट भागातील कब्रस्तानावर पोहोचले. आपल्या पूर्वज आणि नातेवाईकांचे स्मरण केले. यावेळी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांच्यासह मान्यवरांनी मुस्लिम समाज बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.