मंगरुळपीर पं.स.चा शिक्षण विभाग वाºयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 13:55 IST2017-06-10T13:55:34+5:302017-06-10T13:55:34+5:30
शिक्षण विभागातील कर्मचारी मुख्यालयी न राहता घरुनच कारभार करीत असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचे चित्र आहे.

मंगरुळपीर पं.स.चा शिक्षण विभाग वाºयावर
मंगरुळपीर : येथील पंचायत समितीमधील शिक्षण विभागातील कर्मचारी मुख्यालयी न राहता घरुनच कारभार करीत असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचे चित्र आहे.
पंचायत समितीचे मुख्य आणी महत्वाचा विभाग समजल्या जाणाऱ्या शिक्षण विभागात सध्या कर्मचारी तसेच खुद्द गटशिक्षण अधिकारीच लेटलतीफशाही चालवत असुन कार्यालयात क्वचीतच दिसतात. याविषयी विचारणा केल्यास शासनाने खुप कामे लावली असल्याने कार्यालयात येणे होत नसल्याचे वेळकाढु कारण मांडल्या जाते. वरिष्ठच कार्यालयात नसल्याने इतर कर्मचाऱ्यांना फावत असुन तेही मनमानीपणे कारभार चालवत आहेत . तसेच अधिकारी , कर्मचाऱ्यांना वेळेचाही अंकुश राहीलेला नाही. शिक्षण विभागात बायोमॅट्रीक पध्दतीचा अवलंब केल्यास लेटलतीफशाहीवर अंकुश बसेल. कार्यालयात कर्मचारी अनुपस्थित आणी मनमानी कारभार या सर्व प्रकारामुळे ज्ञानप्रक्रीयेला तालुक्यात वाळवी लागत आहे. आपली शाळा सोडुन अनेक शिक्षक पं.स.कडे घिरट्या घालतांना दिसतात . त्यामुळे शाळा वाऱ्यावर राहत असुन गरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होत आहे . शिक्षण विभागाच्या खेळखंडोब्यामुळे सरकारी शाळांकडे लक्ष दिल्या जात नसल्याने पालकांचा खाजगी शाळेकडे कल वाढलेला आहे.एकीकडे शासन करोडो रुपये शिक्षणावर खर्च करीत आहे तर दुसरीकडे शिक्षणाचे शिलेदारच कर्त्यव्याकडे पाठ फिरवत असल्याने जि.प.च्या बहूतांश शाळामधील विद्यार्थी संख्या घटत आहे. अनेक शिक्षक राजकारणात स्वारस्य ठेवुन कत्यव्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. जिप.च्या बऱ्याच शाळांची दुरावस्था झाल्याने डागडुजीकडे लक्ष देणे गरजेचे आहे परंतु याकडे संबधीतांचे लक्षही नाही त्यामुळे पावसाळ्यात शाळा गळत असल्याने विद्यार्थ्यांना गैरसोय होवु शकते .गटशिक्षण अधिकारी मुख्यालयी न राहता अकोल्यातुनच कारभार पाहत असुन भ्रमणध्वनीव्दारेच कर्मचाऱ्यांना सुचना देतात.अधिकारीच कार्यालयात नसल्याने कर्मचारीही टोलवाटोलवीची उत्तरे देवून वेळ मारुन नेतात. शिक्षण विभागाचा सर्व कारभार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचाच भरवश्यावर चालवला जात आहे यामुळे शिक्षकांचा कामचुकारपणा अधिकच वाढत आहे.शिक्षणाच्या विविध उपक्रमासंदर्भात मुख्य कार्यपालन अधिकारी गणेश पाटील यांनी आढावा बैठकी घेतल्या, परंतु नेहमी शिक्षण विभागच ढांग असल्याचे निर्दशनात आल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. या कामचुकार प्रणालीवर सुधारणा करण्यासाठी आता कामचुकार शिक्षण कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाईच करावी अशी मागणी होत आहे.कोणत्याही सभा आणी प्रशिक्षणाला बहूतांश शिक्षक कॅन्टिंग आणी पानटपरीवरच दिसत असल्याने प्रशिक्षणावरचा खर्चही व्यर्थ जात आहे. अनेक केंद्रप्रमुखही प्रत्यक्ष शाळा तपासनी न करता घरुनच अहवाल बनवतात त्यामुळे शिक्षणांचा गचाळपणा कधी चव्हाट्यावर आला नाही , त्यामूळे वरिष्ठांनीच विविध शाळांवर आकस्मिक भेटी द्याव्यात म्हणजे सत्यसमोर येण्यास मदत होईल.