अंगणवाडी सेविकेस मारहाण करणा-या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाला शिक्षा

By Admin | Updated: July 23, 2015 00:31 IST2015-07-23T00:31:29+5:302015-07-23T00:31:29+5:30

खामगाव येथील न्यायालयाचा निकाल; आरोपीस दोन महिने सश्रम कारावास.

Education for Chairperson of School Management Committee who assaulted Anganwadi Sevaks | अंगणवाडी सेविकेस मारहाण करणा-या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाला शिक्षा

अंगणवाडी सेविकेस मारहाण करणा-या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाला शिक्षा

खामगाव : बिस्कीट वाटपाच्या कारणावरून अंगणवाडी सेविकेस अश्लील शिवीगाळ करून मारहाण करणार्‍या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल बुधवारी खामगाव न्यायालयाने दिला. तालुक्यातील उमरा लासुरा येथील अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा चंद्रपाल दांडगे ही अंगणवाडीत ५ मे २00७ ला मुलांना बिस्किट वाटप करीत होती. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश ऊर्फ रामेश्‍वर जानकीराम दांडगे (वय ४५) यांचा मुलगा अनुपस्थित असताना रमेश दांडगे यांनी माझ्या मुलाला बिस्किट का दिले नाही, असे कारण समोर करून अंगणवाडी सेविकेशी वाद घालत अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली, अशी तक्रार अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा दांडगे यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी रमेश दांडगेविरुद्ध कलम ३२३, ५0४, २९४, ५0६ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. याप्रकरणी बुधवारी खामगाव न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्यावतीने एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष व सरकारी अभियोक्ता यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस कलम २९४ मध्ये २ महिने सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवसांची शिक्षा. हीच शिक्षा कलम ३२३ व ५0४ मध्ये भोगावयाची असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. दंडातील तीन हजार फिर्यादीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सदरहू निकाल न्यायाधीश डी.आर. दंडे यांनी दिला. सरकारी अभियोक्ता अँड. इंगळे यांनी काम पाहिले.

Web Title: Education for Chairperson of School Management Committee who assaulted Anganwadi Sevaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.