इसीएच रुग्णालयाची सेवा मर्यादीत स्वरुपात होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:35 IST2021-03-18T04:35:06+5:302021-03-18T04:35:06+5:30

या रुग्णालयातील चार कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्याने तथा रुग्णालयात मोजकेच कर्मचारी असल्याने सेवा ठप्प झाली होती. तसेच हा ...

ECH hospital services will be limited | इसीएच रुग्णालयाची सेवा मर्यादीत स्वरुपात होणार सुरू

इसीएच रुग्णालयाची सेवा मर्यादीत स्वरुपात होणार सुरू

या रुग्णालयातील चार कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्याने तथा रुग्णालयात मोजकेच कर्मचारी असल्याने सेवा ठप्प झाली होती. तसेच हा संसर्ग वाढू नये व एखादा कॅरिअर असल्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन रुग्णालयातील सेवा १४ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे येथील सूत्रांनी स्पष्ट केले. मात्र, परिस्थिती सुरळीत झाली तर निगेटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोग्य सेवा मर्यादित स्वरूपात का होईना सुरू ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे या सूत्रांनी सांगितले, हे रुग्णालय एका सुसज्ज खासगी रुग्णालयाशी संलग्न असल्याने गंभीर रुग्णांच्या उपचारात अडचण येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून हे रुग्णालय बंद झाल्यामुळे माजी सैनिकांची व त्यांच्या कुटुंबीयांची अडचण होत होती. त्या पार्श्वभूमीवर संपर्क साधला असता ही माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: ECH hospital services will be limited