शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील पाच शहरात धावणार ई-रिक्षा

By admin | Updated: August 6, 2016 01:51 IST

वायु प्रदूषणाला बसणार आळा; प्रवासी वाहतुकीचे परवाने देण्यास मान्यता.

नीलेश शहाकारबुलडाणा, दि. ५ : रस्त्यांवरील वाहनांची गर्दी वाढण्यासोबतच अवैध प्रवासी वाहतुकीला चालना मिळत आहे.त्याला आळा घालण्यासह पर्यावरणालापुरक ठरण्याच्या दृष्टीने ई-रिक्षाला प्रवासी वाहतुकीचे परवाने देण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, नागपूर व वर्धा या पाच शहरामध्ये लवकरच ई-रिक्षा धावतांना दिसणार आहे.पर्यावरण सुरक्षा व रोजगार निर्मिती या उद्देशाने गृह विभागाने ३ ऑगस्ट रोजी या संदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाला आदेश दिला. मोटर वाहन कायदा, ११८८च्या कलम ७४(१) मधील तरतुदीनुसार विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, नागपूर व वर्धा तसेच मराठवाड्यातील लातूर या ठिकाणी प्रादेशिक परिवहन विभागाने ई-रिक्षा संदर्भात परवाने देण्याबाबत कार्यवाही करावी, असे आदेशात नमुद आहे.सदर ई-रिक्षाचे परवाने देण्यापूर्वी सबंधीत प्रादेशिक परिवहन विभागाला संबधीत शहरातील पोलीस आयुक्त/अधिक्षक, महानगर पालिका आयुक्त/मुख्याधिकारी यांचे अभिप्राय घेणे बंधनकारक राहणार आहे. राज्य शासनाच्या ई-रिक्षा धोरणानुसार ई-रिक्षा वाहनांचा स्वंतत्र्य संवर्ग राहणार असून चालकाला ई-रिक्षा परवाना मिळाल्यानंतर विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ई-रिक्षा वाहतुकीसाठी वेगळा रस्ता तयार करण्यात येणार आहे.सायकल रिक्षाचालकांना सुगीचे दिवसआदेशानुसार केवळ सायकलरिक्षा चालविणार्‍या चालक, मालक यांनाच ई-रिक्षा परवाने दिले जाणार आहेत. ई-रिक्षाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण केल्या जाणार आहेत. या शिवाय महिला व अंपग व्यक्तींना प्राधान्य राहणार आहे. तसेच ई-रिक्षामुळे शहरातील वायू प्रदुषणाची पातळी कमी करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे.मराठी बोलता येणे अनिवार्यआदेशानुसार ई-रिक्षा परवानासाठी अर्ज करणार्‍यास स्थानिक भाषा व स्थानिक स्थळांची माहिती असणे अनिवार्य असणार आहे. शिवाय त्यांच्यावर १ वर्षात कुठलाही गुन्हा दाखल नसावा, तो शासकीय व खाजगी कंपनीत नोकरीवर नसावा अशी अट आहे.प्रवाशांची घेणार काळजीसदर वाहनांमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र ठेवणे अनिवार्य राहणार आहे. तसेच वाहनावर चालकाचे नाव, पत्ता, फोन क्रमांक रंगविणे अनिवार्य राहील. आसन क्षमतेपक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, उभ्या प्रवाश्यांची वाहतूक केल्यास वाहन जप्त केले जाणार आहे.