ई-लर्निंग प्रणाली काळाची गरज - मुधोळ
By Admin | Updated: February 28, 2015 01:11 IST2015-02-28T01:11:25+5:302015-02-28T01:11:25+5:30
चिखली तालुक्यातील खोर खोर येथे आदर्श गाव योजनेतील राज्यातली पहिली ई-लर्निंग स्कूल.

ई-लर्निंग प्रणाली काळाची गरज - मुधोळ
चिखली (जि. बुलडाणा) : मराठी आपली मातृभाषा असली तरी इंग्रजी ही जागतीक संपर्काची भाषा असल्याने इंग्रजीवर पकड असणे गरजेचे ठरते. गरूड झेप शिक्षण प्रकल्पाचे माध्यमातून ई-लर्नीग प्रोजेक्टर व्दारे दिले जाणारे शिक्षण त्यासाठी निश्चितच महत्वाचे ठरणार असून इंग्रजी भषेत शिकण्याचा उत्तम सराव ई लर्नींगच्या माध्यमातून हो तो. ग्रामीण भागातील विद्यार्थी या शिक्षणामुळे आयएएस व आयपीएस सारख्या परिक्षा देण्यास सक्षम ठरतील, नव्हे ई लर्नींगच्या माध्यमातून असे होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी खोर येथे २६ फेब्रुवारी रोजी जि. प. शाळेत ई लर्नींग प्रोजेक्टर लोकार्पण प्रसंगी बोलतांना केले.
या कार्यक्रमाला कॉग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, प.स.सभापती सविताताई वाघमारे, जि.प.सदस्य सुमीत सरदार, गटविकास अधिकारी राजेश लोखंडे, चंदनसिंग राजपुत, सरंपच सरला जाधव, शाळा समिती अध्यक्षा शिला पांडे, गटशिक्षाधिकारी जे.डी.काळे, विजय वाघमारे, मुरलीधर भुतडा यांची प्रमुख उपस्थिती होती.