अंगणवाड्यांच्या ई-लर्निंगमध्ये भाड्याच्या इमारतींमुळे खोडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 00:51 IST2017-04-21T00:51:53+5:302017-04-21T00:51:53+5:30
बुलडाणा- ई-लर्निंगची सुविधा देण्यासाठी इमारत अंगणवाडीच्या मालकीची असण्याची अट शासनाने घातली आहे; मात्र ९० टक्के अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.

अंगणवाड्यांच्या ई-लर्निंगमध्ये भाड्याच्या इमारतींमुळे खोडा!
हर्षनंदन वाघ - बुलडाणा
ई-लर्निंगची सुविधा देण्यासाठी इमारत अंगणवाडीच्या मालकीची असण्याची अट शासनाने घातली आहे; मात्र जिल्"ात ९० टक्के अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. अंगणवाड्या उभारण्यासाठी निधी देण्यात आला असला, तरीही विविध कारणे पुढे करून नगरपालिका असहकार्य करीत असल्यामुळे अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे जिल्"ातील अंगणवाड्यांना ई-लर्निंग सुविधेपासून वंचित राहावे लागणार आहे.
‘गाव तेथे अंगणवाडी’ असा उपक्रम शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या माध्यमातून राबविला जातो. या उपक्रमातंर्गंत गावागावात अंगणवाड्या मंजूर झाल्या, त्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनिसही नियुक्त करण्यात आले. मात्र जिल्"ात अनेक गावांमध्ये आजही अंगणवाड्या चावडी, मंदिर किंवा शाळेच्या वऱ्हांड्यात भरत आहेत. आता मालकीची इमारत असणाऱ्या अंगणवाड्यांना ई-लर्निंगची सुविधा देण्यात येणार आहे. मात्र या अंगणवाडीच्या इमारतीसाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाकडून निधी मिळाल्यानंतरही नगरपालिका प्रशासन असहकार्य करीत आहे. त्यामुळे जिल्"ातील शहरीभागात जवळपास ९० टक्के अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत भरत असल्याचे वास्तव आहे.