मेहकर : लॉकडाउन काळात ग्राहकांना घरपोच मिळणार भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 18:10 IST2020-04-15T18:09:56+5:302020-04-15T18:10:22+5:30
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सर्व कृषी सहायक यांच्या मदतीने मेहकर शहरातील नागरिकांना घरपोच शारंगधर भाजीपाला बास्केट मिळणार आहे.

मेहकर : लॉकडाउन काळात ग्राहकांना घरपोच मिळणार भाजीपाला
- ओमप्रकाश देवकर
मेहकर : ‘लॉकडाउन’ काळात लोकांनी रस्त्यावर येऊन गर्दी करू नये, शेतकºयांचा भाजीपाला विक्रीअभावी पडून राहू नये व ग्राहकांना ताजा भाजीपाला एकाच वेळी घरपोच मिळावा या संकल्पनेतून तालुका कृषी अधिकाºयांच्या मार्गदर्शनात, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सर्व कृषी सहायक यांच्या मदतीने मेहकर शहरातील नागरिकांना घरपोच शारंगधर भाजीपाला बास्केट मिळणार आहे. यासाठी मेहकर येथील पैनगंगा शेतकरी गटाने पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत आहे. संचारबंदीमुळे सर्व काही बंद ठेवण्यात आलेले आहे. फक्त जीवनावश्यक बाब म्हणून भाजीपाला विक्री सकाळी ०७ ते ११ वेळेत सुरू ठेवण्यात आली आहे. परंतु याठिकाणी गर्दी होऊ लागल्याने बुधवारपासून कृषी विभागाच्या वतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत मेहकर येथील पैनगंगा शेतकरी स्वयं सहाय्यता गटाच्या माध्यमातून शारंगधर भाजीपाला बास्केटद्वारे आवश्यक सर्व भाजीपाला एकाच वेळी ग्राहकांना घरपोच मिळणार आहे. यासाठी गटाचे अध्यक्ष विजय चांगाडे यांनी पुढाकार घेतला आहे. ग्राहकांनी व्हाटसअॅप संदेश, माहितीपत्रक यामध्ये नमूद मोबाईल क्रमांकाला संपर्क करून आपल्याला आवश्यक असेलला भाजीपाला तसेच फळांची बुकींग करावयाची आहे. बुकींग करताना आपले नाव, संपर्क क्रमांक व सविस्तर पत्ता नोंदविणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यांना शारंगधर भाजीपाला बास्केट शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत घरपोच मिळणार आहे. विशेष म्हणजे बास्केटच्या बुकिंग करीता गटांच्या सदस्यांसोबतच कृषी विभागाच्या कार्यालयातील कर्मचाºयांचेसुद्धा मोबाईल क्रमांक देण्यात आलेले आहेत. ग्राहक त्यांच्याकडे सुद्धा सायंकाळी ६ वाजेपर्यंत बुकिंग करू शकतात. जेणेकरून दुसºया दिवशी सकाळी शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत बास्केट घरपोच देणे शक्य होईल.
घरपोच सेवेकरिता कमीत कमी १०० रुपयांची उत्पादने विकत घेणे बंधनकारक आहे. विकत घेतलेल्या उत्पादनाचे पैसे डीलीव्हरीच्या वेळेस रोख स्वरूपात जमा करण्यात यावे. उत्पादनाचे दर बाजारपेठमधील भावानुसार कमी अधिक होतील. ही सुविधा ग्राहकांसाठी सोयीस्कर ठरणार आहे.
जास्तीत जास्त शेतकरी गटांमार्फत अशाच प्रकारे बास्केट स्वरूपात थेट घरपोच भाजीपाला व फळे विक्री करण्यात येईल. या माध्यमातून शेतकºयांचे होणारे नुकसान टाळून सोबतच ग्राहकांच्या आरोग्याची जपणूक करण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे.
- सत्येंद्र चिंतलवाड, तालुका कृषी अधिकारी, मेहकर