विहिरीत पडून विद्यार्थिनीचा मृत्यू
By Admin | Updated: September 22, 2014 00:38 IST2014-09-22T00:38:31+5:302014-09-22T00:38:31+5:30
शेतामधील विहिरीत पाय घसरून एका १६ वर्षीय विद्यार्थिनिचा मृत्यू झाल्याची घटना

विहिरीत पडून विद्यार्थिनीचा मृत्यू
मोताळा (बुलडाणा) : तालुक्यातील धामणगाव बढे परिसरातील एका शेतामधील विहिरीत पाय घसरून एका १६ वर्षीय विद्यार्थिनिचा मृत्यू झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी घडली.
धामणगाव बढे येथील परशराम शिवराम जाधव यांची १0 व्या वर्गात शिक्षण घेणारी मुलगी आश्विनी वय १६ ही १९ सप्टेंबर रोजी आपल्या आई सोबत धामणगाव बढे परिसरातील बेहरदळ शिवारातील गट नं १९ मधील स्वत:चे शेतात शेत काम करण्यासाठी गेली होती. मात्र आर्श्विनी परत न आल्यामुळे नातेवाईकांसह इतरत्र शोध घेतला. दरम्यान रविवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी मुलीचा भाऊ विठ्ठल जाधव यास आश्विनीचे प्रेत त्या पडक्या विहिरीमध्ये पाण्यावर तरंगतांना आढळले. या बाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.