विजेअभावी पिके धोक्यात

By Admin | Updated: October 1, 2014 00:37 IST2014-10-01T00:37:05+5:302014-10-01T00:37:05+5:30

देऊळगावराजा येथे कृषी पंपांना वीजपूरवठा अनियमित.

Due to the risk of unnecessary crops | विजेअभावी पिके धोक्यात

विजेअभावी पिके धोक्यात

देऊळगावराजा (बुलडाणा) : विहिरीत भरपूर पाणीसाठा असतानाही केवळ कृषी पंपांना नियमित वीजपूरवठा होत नसल्याने शेकडो हेक्टरवरील शेतकर्‍यांचे पीक नष्ट होत आहे. विजेला पर्याय म्हणून वापरण्यात येणार्‍या डिझेल इंजीनला दररोज ५00 ते ७00 रु. खर्च करुन शेतमजुराला २00 ते २५0 रु. रोजाप्रमाणे मजुरी द्यावी लागते यामुळे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ सारखाच झाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.
देशाचा कर्ता तथा पोशींदा असलेला शेतकरी आपल्या शेतात पिकविलेल्या धनधान्यामधून सर्वांची भूख भागवितो. सध्या महागडी बियाणे, खत, औषधी, किटकनाशके यावर प्रतीएकरी बळीराजा प्रचंड प्रमाणात खर्च करुन कशीबशी पेरणी करतो. वेळप्रसंगी त्याला सावकाराच्या दारात जावे लागते. आपल्या काळ्या मातीत पांढरे सोने पिकविताना कधीकधी वरुणराजा अचानक रुसून बसतो अशी परिस्थिती आहे. सध्या समाधानकारक पाऊस झाला असला तरी वीज नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. फळपीके व भाजीपाला पिके घेणार्‍या शेतकर्‍यांना शेतातील पाणी विजे मुळे नियमीत पणे देता येत नाही. शेतकर्‍यांना केवळ आठ ते दहा तास विजेची गरज असताना अनियमित वीज पुरवठा कमीदाबाचा पुरवठा, तीन फेज पैकी केवळ दोनच फेज सुरू राहणे या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने सध्या शेतकर्‍याना प्रचंड मानसीक त्रास व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Web Title: Due to the risk of unnecessary crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.