मान्सून लांबल्यामुळे बियाणे बाजार ठप्प

By Admin | Updated: July 7, 2014 22:36 IST2014-07-07T22:36:57+5:302014-07-07T22:36:57+5:30

पाऊस लांबल्यामुळे खत व बियाण्यांची विक्री पुर्ण पणे थांबली आहे.

Due to monsoon delay the seed market jam | मान्सून लांबल्यामुळे बियाणे बाजार ठप्प

मान्सून लांबल्यामुळे बियाणे बाजार ठप्प

खामगाव: पाऊस लांबल्यामुळे खत व बियाण्यांची विक्री पुर्ण पणे थांबली आहे. बुलडाणा जिल्यातील व्यापार्‍यांनी हजारो टन खत व बी भरुन ठेवले आहे. त्यामध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. बीयाणे व खताची विक्री होत नाही. पण, आता मान्सून लाबल्यामुळे पिकांची पेरणी ही बदलणार आहे. यामुळे आता या बीयाण्याचे काय करायचे असा प्रश्न विक्रेत्यांसमोर उभा ठाकला आहे.
दरवर्षी सरासरी जूनच्या अखेरच्या आठवड्यात जवळपास ७0 टक्के पेरणी पूर्ण होत असते. पेरणीसाठी लागणारे बीयाण्यांची बुकींग व्यापारी दिवाळीच्या नंतर लगेच करुन ठेवतात. त्यानूसार त्यांना माल उपलब्ध होतो. पावसाळ्य़ात माल कमी पडू नये म्हणून ही काळजी घेतलेली असते. तेव्हापासून व्यापार्‍यांचा पैसा कंपन्याकडे जमा असतो. साधारण मे महिन्याच्या मध्यापासून शेतकरी बीयाणे खरेदीसाठी येत असतात कारण नंतर कधी बीयाण्याचे भाव अचानक वाढवले जातात तर खताचा तुटवडा जाणवतो यासाठी शेतकरी अधीच बीयाणे खरेदी करतात. मात्र यंदा अद्यापही पेरणी चालू झाली नाही. जुलैच्या मध्यापंर्यंंतही पेरणी होण्याची शक्यता नाही.
यामुळे शेतकरी वर्गा सोबतच व्यापारी वर्गही चिंतेत अडकला आहे. एकंदरीत बीयाण्याच्या व खताच्या खरेदीमध्ये अडकलेले हजारो कोटीचे व्यवहारही थांबले आहेत. बाजारातही मंदीचे सावट निर्माण झाले आहे. व्यापार्‍यांनी बीयाणे विक्रीसाठी घेतले तरी शेतकरी बीयाणे घेण्यासाठी तयार नाहीत. यामुळे बाजार पेठेतील विक्री पुर्ण ठप्प झाली आहे. आता शेतकर्‍यांसह सर्वाच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहे.

Web Title: Due to monsoon delay the seed market jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.