शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

महावितरणच्या सौभाग्य योजनेत मिटर तुटवड्याचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 18:21 IST

मलकापूर: महावितरण कंपनीच्या मलकापूर उपविभागात मागील काळात नविन मिटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब शासनाच्या सौभाग्य योजनेत खोडा टाकणारी  ठरत आहे.

ठळक मुद्देमलकापूर तालुक्यातील शेकडो ग्राहकांनी विज कनेक्शनसाठी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. सौभाग्य योजनेत नविन कनेक्शनसाठी नविन मिटरच उपलब्ध नाहीत.

- हनूमान जगतापमलकापूर: महावितरण कंपनीच्या मलकापूर उपविभागात मागील काळात नविन मिटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब शासनाच्या सौभाग्य योजनेत खोडा टाकणारी  ठरत आहे. परिणामी शेकडो ग्राहकांची कनेक्शनची प्रतिक्षा कायमच आहे. महत्वाचं म्हणजे, या योजनेच्या उद्दीष्टपुर्तीसाठी जुनी मिटर लावण्याचा प्रपंच केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती असून  हा प्रकार ग्राहकांसाठी धोकादायक असाच आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, विज चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाच्या वतीने वेगवेगळ्या योजना अमलात आणल्या जात आहेत. त्याचा भाग म्हणून राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने काही दिवसांपुर्वी प्रधानमंत्री सौभाग्य योजना अमलात आणण्यात आली. देशाच्या प्रत्येक घरात विज पोहचविण्याचा उद्देश त्यामागे आहे. गरीब कुटुंबांना मोफत विज कनेक्शन सौभाग्य योजनेत दिल्या जात असून जनगणनेच्या आधारावर लक्ष देण्यात येत आहे. त्या धरतीवर मलकापूर तालुक्यातील शेकडो ग्राहकांनी विज कनेक्शनसाठी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. मात्र मलकापूर येथे नविन मिटरच उपलब्ध नसल्याचा प्रकार समोर येत असून महावितरण कंपनीतील मिटरचा तुटवडा सौभाग्य योजनेत खोडा ठरत आहे. परिणामी परिसरातील शेकडो ग्राहकांची नविन कनेक्शनसाठी  प्रतिक्षा कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान सौभाग्य योजनेत नविन कनेक्शनसाठी नविन मिटरच उपलब्ध नाहीत, अशा परिस्थिीतीत योजनेच्या उद्दीष्टपुर्तीसाठी नविन ग्राहकांना जुनेच भंगारात पडलेले मिटर  देण्याचा प्रपंच मलकापूर परिसरात सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. अशा परिस्थीतीत जुने मिटर ग्राहकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय जुने मिटर   पुन्हा एकदा अव्वाच्या सव्वा बिले द्यायला लागल्यास नविन वाद निर्माण होवू शकतो. त्या धर्तीवर नविन मिटराचा तत्काळ पाठपुरावा व्हावा, अशी मागणी होताना दिसते. 

चार महिन्यापासून प्रतिक्षा कायमचमलकापूर उपविभागात सौभाग्य योजनेव्यतिरीक्त इतर ग्राहकांत मोडणाºया घरगुती, व्यावसायीक, शेतीपंप, अशा विविध ग्राहकांनी चार मन्यिापासून पैसे भरल्यावरही मिटर अभावी त्यांची नविन कनेक्शनची पतिक्षाच कायम असल्याने ग्राहकातून तिव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.मलकापूर उपविभागात नविन मिटरचा पुरवठा कमी आहे. त्यासाठी आमचा वरिष्टांकडे पाठपुरावा सुरू आहे. सौभाग्य योजनेच्या पुर्तीसाठी लवकरच नविन मिटर उपलब्ध होतील. ग्राहकांनाही लवकरात लवकर मिटर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.अनिल शेगांवकर, उपकार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी, मलकापूर.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरmahavitaranमहावितरण