शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 16:37 IST

भाडेवाढीत काही प्रमाणात अन्याय झाल्याच मत व्यक्त होताना दिसत असून मलकापूर तालुक्यात त्याविषयी काही प्रवाशात राजीचा तर काही प्रवाशात नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. 

ठळक मुद्देएका वर्गात नव्याने झालेल्या एसटीच्या भाडेवाढीविषयी नाराजी प्रकट होताना दिसत आहे.एखाद्या गावचे एसटी भाडे या आधी १४ रु. होते ते आता २० रुपये आकारले जाईल.आता नवीन भाडेवाढ ही ५ रुपयांच्या पटीन झाल्याने त्यावर एसटी महामंडळाने तोडगा काढल्याच दिसत आहे.

- हनुमान जगताप मलकापूर : राज्यभरात एसटीच्या प्रवास शुल्कात शनिवारपासून २८ टक्क्यांनी दरवाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सदरची भाडेवाढ ५ रुपयांच्या पट्टीत करण्यात आल्याने प्रवास शुल्क ‘राऊंडफिगर’मध्ये आकारण्यात येईल. वर वर पाहता भाडेवाढ प्रवाशांच्या सोयीसाठी उपयुक्त वाटत असली तरी या भाडेवाढीत काही प्रमाणात अन्याय झाल्याच मत व्यक्त होताना दिसत असून मलकापूर तालुक्यात त्याविषयी काही प्रवाशात राजीचा तर काही प्रवाशात नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. डिझेल दरवाढीच्या तसेच इतर कारणावरुन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशी शुल्कात राज्यभरात १८ टक्क्यांनी भाडेवाढ केली आहे. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे. अर्थात विविध क्षेत्रात दिसागणीक होणाºया दरवाढीची नागरिकांना एकाअर्थी सवयच झाल्याने एसटीच्या दरवाढीविषयी प्रवाशात ‘यात नवल वाटण्याच कारण नाही’ अशा प्रतिक्रीया उमटताना दिसत आहेत.१८ टक्क्यांनी दरवाढीचा परीणाम तालुक्यातून लांब पल्ल्यांच्या प्रवाशासाठी म्हणावा तसा परिणामकारक नसला तरी स्थानीय स्तरावर सामान्य नागरिक हा पै पै चा हिशोब ठेवण्याºया श्रेणीत मोडणारा असल्याने एका वर्गात नव्याने झालेल्या एसटीच्या भाडेवाढीविषयी नाराजी प्रकट होताना दिसत आहे.राज्यभरात झालेली भाडेवाढ १८ टक्यांनी झाली असली तरी ती ५ रुपयांच्या पटीत झाली आहे. म्हणजे एखाद्या गावचे एसटी भाडे या आधी १४ रु. होते ते आता २० रुपये आकारले जाईल. एखाद्या गावचे भाडे १२ रुपये होते ते आता १० रुपये आकारले जाईल. एखाद्या गावचे भाडे १६ रुपये होते ते १५ रुपये आकारले जाईल. म्हणजेच भाड्यााची आकारणी आता ‘राऊंडफिगर’ मध्ये होईल, असे आगाराच्या सुत्रांशी झालेल्या चर्चेवरुन स्पष्ट होते. त्यामुळे मलकापूर तालुक्याविषयी सांगायच झाल्यास राज्यपरिवहन महामंडळाने एसटी प्रवास भाड्याविषयी काहींची राजी तर काही प्रवाशांची नाराजी असल्याच दिसतं. त्या वादांना मिळणार विरामएसटीची भाडेवाढ ‘राऊंडफिगर’ मध्ये  झाल्याने चिल्लरच्या मुद्दयावरुन प्रवाशी व वाहक यांच्यात मिनीटाला होणाºया वादांना विराम मिळण्याची शक्यता आहे. एरवी प्रत्येक बसमध्ये प्रवास लहाान असो किंवा मोठा वाहक आणि प्रवाशी यांच्यातील वाद नित्याचेच होत राहतात. आता नवीन भाडेवाढ ही ५ रुपयांच्या पटीन झाल्याने त्यावर एसटी महामंडळाने तोडगा काढल्याच दिसत आहे.

गावाचे नांव    आधीचे भाडे    आताचे भाडेवडोदा                १४ रु.       १५ रु.देवधाबा            १७ रु.        २० रु.वरखेड              २० रु.       २५ रु.दाताळा             १० रु.       १० रु.जांबुळधाबा       १४ रु.      १५ रु.धरणगाव         १४ रु.       १५ रु.दसरखेड           १७ रु.      २० रु.वाघोळा           १७ रु.      २० रु.विवरा              १७ रु.      २० रु.उमाळी           १४ रु.      १५ रु.

टॅग्स :Malkapurमलकापूरstate transportराज्य परीवहन महामंडळ