शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी प्रकल्पाचे काम अपूर्ण राहणारी नाही - शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 15:06 IST

निधीअभावी कुठलाही प्रकल्प अपूर्ण राहणार नाही, असे मत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिगांव प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी लवकरच मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. निधीअभावी कुठलाही प्रकल्प अपूर्ण राहणार नाही, असे मत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात विविध विभागांच्या आढावा बैठकीचे आयोजन पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे उपस्थित होते.अधिकाऱ्यांनी कुणाचेही दडपण न घेता काम करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, आपल्या विभागातंर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनेचे १०० टक्के अंमलबजावणी करा. नियमात बसून काम करा. नियमबाह्य कोणतेही काम करू नका. आपल्या विभागातंर्गत सुरू असलेल्या कामाची खरी माहिती द्यावी. आपल्या विभागातील अडी-अडचणींची टिपणी द्यावी. मंत्रालय स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव, निधीअभावी प्रलंबित कामे, रिक्त पदे आदींची माहिती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात प्रत्येक विभागात असलेली रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येणार आहे. सिंदखेड राजा पर्यटन आराखड्यातील कामे दर्जेदार करण्याचे निर्देश देत पालकमंत्री म्हणाले, या आराखड्यातील कामे ऐतिहासिक ठिकाणांची आहे. ही कामे करताना ऐतिहासिक स्वरूप टिकवून ठेवावे, असे निर्देश शिंगणे यांनी दिले. . जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी बैठकीचे आभार प्रदर्शन केले. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी जिल्हा परिषद सिंचन विभागाकडील पाझर तलावांच्या भूसंपादन मोबदला मिळण्याची मागणी केली. बैठकीला विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणे