उत्पादनात घट आल्याने फटका!

By Admin | Updated: October 25, 2014 23:31 IST2014-10-25T23:31:02+5:302014-10-25T23:31:02+5:30

खामगाव तालुक्यातील शेतक-यांचा सलग चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना.

Due to decrease in production! | उत्पादनात घट आल्याने फटका!

उत्पादनात घट आल्याने फटका!

बळीराम वानखडे / खामगाव (बुलडाणा)
खामगाव : तालुक्यातील शेतकर्‍यांना सलग चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला असून, यंदाही त्याचा फटका बसला आहे. खरीप हंगामातील पिकांच्या उत् पादनात मोठी घट आल्याने ऐन सणासुदीतच शेतकर्‍यांचे दिवाळे निघाले आहे.
तालुक्यात यंदा तब्बल दोन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पाऊस झाला. त्यातही हा पाऊस पश्‍चिम भागात दमदार झाला, तर पूर्व भागात केवळ रिमझिम पाऊस पडला. त्या पावसावरच खरिपाची पिके आली असून, त्यांना पाण्याचा ताण पडल्याने उत्पादनातही मोठी घट झाली आहे. ज्या शेतकर्‍यांची आर्थिक मदार केवळ शेतीवर अवलंबून आहे, अशा शेतकर्‍यांची दिवाळी निरुत्साही वातावरणातच साजरी झाली. अनेक शेतकर्‍यांवर विविध बँका, पतसंस् थांच्या कजार्चा बोजा असल्याने वसुलीसाठी सुरू असलेला तगादा, पाणी नसतानाही भरावे लागणारे वीज बिल, उत्पादनात घट या संकटांसोबतच कमी पाण्यामुळे पिकांची प्रतवारी घसरल्याने मालाला बाजारात समाधानकारक भाव मिळाला नाही. पावसाअभावी यंदा रब्बी हंगामातील पिकांची शाश्‍वती नसल्याने खरिपाची कसर कुठे भरून काढायची, ही समस्या शेतकर्‍यांपुढे आहे. त्यामुळे त्यांच्या दिवाळी सणाला उत्साह नसल्याचे दिसून आले.

Web Title: Due to decrease in production!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.