डोंगरातील दरड कोसळल्यामुळे धोका!

By Admin | Updated: August 2, 2016 01:36 IST2016-08-02T01:36:54+5:302016-08-02T01:36:54+5:30

प्रशासनाचे दुर्लक्ष; बुलडाणा- मलकापूर मार्गावरून धावतात शेकडो वाहने.

Due to the cracks in the mountains, the danger! | डोंगरातील दरड कोसळल्यामुळे धोका!

डोंगरातील दरड कोसळल्यामुळे धोका!

नीलेश शहाकार / बुलडाणा
बुलडाणा शहराला मलकापूर मार्गावर जवळपास ४ कि.मी.चा वळणदार घाट लाभला आहे. मात्र या घटातून जाणार्‍या वळणदार रस्त्यावर पावसाळ्यात वारंवार भूस्खलन होत असल्यामुळे घाटातून प्रवास करणार्‍या नागरिकांना धोका निर्माण होत आहे.
शहराच्या चारही बाजूंनी अजिंठय़ाच्या डोंगररांगा आहेत. त्यामुळे शहराचा विस्तार थेट डोंगररांगांपर्यंत झाला आहे. शहरातून बाहेर निघाणार्‍या मुख्य मार्गापैकी बोथा घाट मार्गे खामगाव, अकोला शहराला जाता येते. तर राजूर घाटातून मोताळा, मलकापूर व पुढे मध्य प्रदेशात जाण्याचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग शहरासाठी महत्त्वाचे आहेत. यापैकी राजूर घाटातील मार्ग वळणार व जास्त जोखमीचा असून, येथून होणारी वाहतूक जास्त व्यस्त आहे. मात्र या घाटात असणारा डोंगर मुरमाड खडकाचा बनला असून, अतिपाऊस पडला, की माती भुसभुशीत होऊन डोंगरातील दगड रस्त्यावर येऊन पडतात. त्यामुळे घाटातील वळण रस्त्यांवर दगडांचा मोठा ढीग साचलेला दिसतो.
घाटात बर्‍याच ठिकाणी धोकादायक वळण असून, नेमके त्याच ठिकाणी भूस्खलन होऊन रस्त्यावर व रस्त्यालगत मोठमोठे दगड पडलेले असतात.
त्यामुळे बर्‍याचवेळा रात्रीच्यावेळी भरधाव वाहनांच्या चाकाखाली हे दगड आल्यामुळे वाहनाला अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बर्‍याच अपघातात नागरिक जखमी झाले, तर काहींचे जीवही गेले आहेत.

वर्षभरात अपघाताची मालिका
वर्षभरात तब्बल पंधरा अपघाताची नोंद आहे. यात श्री हनूमान मंदिरानजिक वळमार्गावर तेलाचे टँकर पडल्याची घटना ताजी आहे. तर काही महिन्यांपूर्वी मलकापूरला जाणार्‍या बसच्या चाकाखाली दगड येऊन ती उलटली होती. सुदैवाने यात हानी झाली. शिवाय डोंगरातील दगड पडून गाडीच्या काचा, नागरिकांची डोके फुटण्याच्या घटनाही नेहमीच्या आहेत.

रात्री मोठय़ा वाहनांचा धोका
रात्रीच्या वेळी बोधा घाटातील मार्ग बंद राहत असल्यामुळे मध्यप्रदेशकडे जाणार्‍या मोठय़ा वाहनाची राजूर घाटातून वर्दळ असते. शिवाय मलकापूर व मोताळाकडे जाणार्‍या नागरिकही याचा मार्गाने प्रवास करतात. बर्‍याचवेळा राजूर घाटात घडलेली लहानमोठय़ा अपघाताची मालिका मोठी आहे.

Web Title: Due to the cracks in the mountains, the danger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.