पाळण्याचा फास लागल्याने इसमाचा मृत्यू

By Admin | Updated: April 30, 2017 19:40 IST2017-04-30T19:38:35+5:302017-04-30T19:40:15+5:30

नांदुरा : पाळण्याच्या दोरीचा फास लागल्याने ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील डिघी येथे शनिवारी सकाळचे सुमारास घडली.

Due to the absence of a passing abortion, your death | पाळण्याचा फास लागल्याने इसमाचा मृत्यू

पाळण्याचा फास लागल्याने इसमाचा मृत्यू

नांदुरा : पाळण्याच्या दोरीचा फास लागल्याने ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील डिघी येथे शनिवारी सकाळचे सुमारास घडली. तालुक्यातील डिघी येथील रहिवासी रमेश वाघ (वय ६०) यांना वर्षभरापुर्वी पॅरालीसीस (लखवा) चा अटॅक आल्याने ते घरातच अंथरूणावर खिळले होते. उपचाराने काही महिन्यांपासून ते काठी टेकवित थोडेफार चालायचे. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते घरातीलच मागच्या खोलीत काठी टेकवीत गेले असता त्यांच्या हातातील काठी निसटली व ते नातवंडांसाठी केलेल्या पाळण्याच्या दोरीमध्ये अडकले व त्यांना गळफास लागला. लखव्यामुळे हात-पाय निकामी असल्याने त्यांना स्वत:ची सुटका करता आली नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला.
सदर दुर्देवी घटनेमुळे डिघीसह परिसरात शोककळा पसरली आहे. रमेश वाघ यांचे पश्चात ४ मुले, सुना, ४ मुली व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

Web Title: Due to the absence of a passing abortion, your death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.