दुष्काळग्रस्तांना तुटपुंजी मदत
By Admin | Updated: January 20, 2015 23:29 IST2015-01-20T23:29:08+5:302015-01-20T23:29:08+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांमध्ये रोष; एकरी खर्चापेक्षा मदत कमी.

दुष्काळग्रस्तांना तुटपुंजी मदत
बुलडाणा : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी ४५00 म्हणजेच एकरी केवळ १८00 रुपये मदत दिली जात आहे. मात्र शेतकर्यांना पिकांसाठी एकरी १५ ते २0 हजारांवर खर्च येत असताना, त्या तुलनेत सरकारकडून मिळणारी मदत अत्यंत तुटपुंजी असल्याने मदतीच्या नावाखाली दुष्काळग्रस्त शेतकर्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
५ ऑगस्ट २0१४ च्या शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार अल्प व अत्यल्पभूधारक शेतकर्यांना दोन हेक्टर र्मयादेपयर्ंत आणि बहुभूधारक शेतकर्यांना एक हेक्टर र्मयादेपर्यत मदतीचे वाटप करण्यात येत आहे.
त्यामध्ये जिरायती (कोरडवाहू) शेतीसाठी हेक्टरी ४हजार ५00 रुपये, बागायती शेतीसाठी हेक्टरी ९ हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी १२ हजार रुपये शेतकर्यांना मदत दिली जात आहे.
दुष्काळग्रस्त शेतकर्यांना देण्यात येणार्या मदतीबाबत शासनाने पुर्नविचार करणे गरजेचे आहे. उत्पादन खर्चा एवढीही मदत आताच्या पॅकेज मधुन मिळत नाही त्यामुळे शेतकर्यांमध्ये रोष आहे. अनेक ठिकाणी निवडण्यात आलेल्या लाभार्थ्यांबाबतही तक्रारी येत आहेत त्याचीही शहानिशा होण्याची गरज े स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली.
* बुलडाणा जिल्ह्यात १४२0 दुष्काळग्रस्त गावांचा समावेश आहे. ही परिस्थिती लक्षात घेतली जिल्ह्यातील शेतकर्यांना एकूण २८७ कोटी ९४ लाखाची मदत जाहिर करण्यात आली असुन त्यापैकी ११९ कोटी ७४ लाखाची मदत प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील ५ लाख ४८ हजार ६६६ शेतकरी मदतीस पात्र ठरले आहे त्यापैकी पहिल्या टप्यात २ लाख २0 हजार शेतकर्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत.
* कोरडवाहू शेतकर्यांना दोन हेक्टर र्मयादापयर्ंत हेक्टरी ४ हजार ५00 रुपये म्हणजेच एकरी १ हजार ८00 रुपये मदत दिली जात आहे. वास्तविक, शेतीच्या मशागतीपासून तर कापणी-मळणीपयर्ंत खर्चच कमीत कमी एकरी १५ ते २0 हजार रुपयांचा येतो. त्या तुलनेत सरकारकडून दिली जाणारी एकरी १८00 रुपयांची मदत अत्यंत तोकडी आहे.