शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भेगाळलेली धरणी माता खुणावते दुष्काळाची दाहकता            

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:41 IST

बुलडाणा: जिल्ह्यात धरण, तलावांची भेगाळली धरणी माता दुष्काळाची दाहकता खुणावत आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: जिल्ह्यात धरण, तलावांची भेगाळली धरणी माता दुष्काळाची दाहकता खुणावत आहे. गावोगावी पाणी प्रश्न पेटला असून, अनेकांच्या हाताला कामी नाही. त्यामुळे विकतच्या पाण्यासाठीही घरात पैसे उपलब्ध होत नाहीत. असे विदारक चित्र अनेक गावांमध्ये सध्या पाहावयास मिळत आहे. तर मेहकर, लोणार तालुक्यातील काही गावातील ८० ते ९० टक्के लोक रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत झाले आहेत. दुष्काळाच्या दाहकतेत सर्वसामान्य होरपळून निघत असताना  मजुरांच्या हातालाही काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे कामाच्या शोधात जिल्ह्यातील मजुरांचे परजिल्ह्यात स्थलांतर वाढले आहे. जिल्ह्यातील काही गावांच्या  नशिबी कायम आर्थिक, सामाजिक आणि नैसर्गिक मागासलेपण पाचवीला पुजले आहे. घरी अत्यल्प एक ते दोन एकर शेती, त्यात निसर्गाची अवकृपा. यामुळे शेतीतील उत्पादनासाठी खर्चच अधिक होत असल्याने तोट्यात जाणाºया शेतीला कंटाळून अनेकांनी मजुरी सुरू केली; परंतु मजुरीसाठी गावातच नव्हे, तर परिसरातही कुठे काम मिळत नसल्याचे भयावह जिल्ह्यातील काही गावांमध्ये आहे. जिल्ह्यातील गोत्रा, नांद्रा, रायगाव, मढी, पहुर, दाभा, खुरामपूर, टिटवी व इतर गावातील आदिवासी कुटुंब बाहेरगावी जाऊन काम करीत आहे. लोणार तालुक्यातील टिटवी या गावी मजुरांना हाताला काम नसल्याने परजिल्ह्यात मजुरांचे स्थलांतर वाढले आहे. जवळपास टिटवी येथील ८० ते ८५ टक्के लोक रोजागाराच्या शोधात बाहेरगावी गेलेले आहेत. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेशिवाय कुठलीच कामे होत नाहीत; परंतु रोहयोच्या कामावरही मजुरांऐवजी जेसीबीचा वापर होत आहे. त्यामुळे स्थानिक मजुरांच्या हाताला काम मिळेल, अशी कुठलीच उपाययोजना शासनाकडून केली जात नाही. त्यात आता पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. धरण, तलावांनी तळ गाठल्याचे दिसून येते आहे. पाणी पुरवठा निवारणार्थ उपाययोजनांसाठी जिल्ह्यात टँकरची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १९९ गावांतील लाखो नागरिकांची तहान सुमारे २०६ टँकरद्वारे भागविण्यात येत आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील २३ गावांसाठी २४ टँकर, चिखली तालुक्यातील १४ गावांसाठी १५ टँकर, देऊळगाव राजा तालुक्यातील २७ गावात २८ टँकर, लोणार तालुक्यातील आठ गावात ११ टँकर, मेहकर तालुक्यात १४, मोताळा १८, मलकापूर ५, नांदुरा १९, शेगाव २२, खामगाव २९, संग्रापूर एक अशा प्रकरे एकूण २०६ टँकर सुरू करण्यात आले आहेत. 

 लोणार शहराला होणारा पाणीपुरवठा काळेपाणी गायखेड व इतर ठिकाणाहून होणारा पाणीपुरवठा कमी होत आहे.  त्यामुळे शहरवासीयांना व सर्वसामान्य जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरामध्ये खासगी टँकरद्वारे पाण्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. - हाजी मोहम्मद रिजवान, लोणार. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाdroughtदुष्काळ