अपघातात चालक ठार

By Admin | Updated: January 10, 2017 02:41 IST2017-01-10T02:41:11+5:302017-01-10T02:41:11+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील वढाला फाट्यानजीक घडला अपघात.

The driver killed in the accident | अपघातात चालक ठार

अपघातात चालक ठार

मलकापूर, दि. 0९- मलकापूर येथून पुणे जात असलेल्या श्री साईराम ट्रॅव्हल्सला विचित्र अपघात घडून, या अपघा तात मलकापूर येथील ट्रॅव्हल्सचा चालक ठार झाला. ही घटना ९ जानेवारीच्या पहाटे अहमदनगर जिल्ह्यातील वढाला फाट्यानजीक घडली. ८ जानेवारी रोजी ८.३0 वाजेच्या सुमारास शहरातील श्री साईराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस प्रवासी घेऊन बुलडाणा मार्गे पुण्याकडे रवाना झाली. दरम्यान, वढाला फाट्यानजीक भरधाव असलेल्या मालवाहू ट्रेलर वाहनाचे टायर फुटले. त्यानंतर दुसर्‍या ट्रेलरच्या वाहन चालकाने ब्रेक लावले. त्यामुळे ट्रेलर तिरपे झाल्याने त्या मागे असलेल्या श्री साईराम ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसला जोरदार धक्का बसला. यात चालक प्रकाश जनार्दन म्हस्कादे (वय ४२) रा. सावजी फैल हे ठार झाले.

Web Title: The driver killed in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.