दुचाकी अपघातात चालक ठार, एक गंभीर
By Admin | Updated: September 2, 2015 23:55 IST2015-09-02T23:55:27+5:302015-09-02T23:55:27+5:30
मातोळा तालुक्यातील अपघात.

दुचाकी अपघातात चालक ठार, एक गंभीर
मोताळा (जि. बुलडाणा): मोताळा-नांदुरा रोडवरील विश्वगंगा नदी जवळ पायी येणार्या एका इसमाला मोटारसायकलने धडक दिली. हा अपघात मंगळवारी रात्री झाला. यात धडक बसलेला इसम गंभीर जखमी असून दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. मृतक मुकेश वसंत उमाळे यांच्या भरधाव वेगातील दुचाकीने (एम.एच. २८ ए.सी. १४५३) सुरेश बोरकर यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी चालकासह दोघे गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना बुलडाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मुकेश वसंत उमाळेचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या सुरेश बोरकर यास औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी गजानन आनंदा बोरकर यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी वाहनचालाकाविरूद्ध कलम २७९, ४२७,३३८ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.