वाहने सावकाश चालवा; मोकाट जनावरे वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:38 IST2021-09-23T04:38:55+5:302021-09-23T04:38:55+5:30

बुलडाणा शहरातील बाजार लाईनसह मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. ...

Drive slowly; Mokat animals grew! | वाहने सावकाश चालवा; मोकाट जनावरे वाढली!

वाहने सावकाश चालवा; मोकाट जनावरे वाढली!

बुलडाणा शहरातील बाजार लाईनसह मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. अनेकवेळा तर रस्त्यावरच या मोकाट जनावरांमुळे वाहतूककोंडी निर्माण होते. अशावेळी त्याठिकाणी वाहतूक पोलीसही हजर नसतात. त्यामुळे वाहचालकांना जीव धोक्यात घालून रस्त्याने वाहन चालवावे लागते. मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम नगर पालिकेकडून सातत्याने राबवली जात नसल्याने या जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवरील या जनावरांमुळे वाहन चालक नव्हे, तर सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढत असताना त्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत नाहीत.

या मार्गावर वाहने जपून चालवा

बुलडाणा शहरातील मुख्य बाजार लाईन

जयस्तंभ चौक ते धाड नाका

बुलडाणा ते चिखली रोड

बुलडाणा ते मलकापूर रोड

संगम चौक ते जिल्हा सामान्य रुग्णालय

मोकाट जनावरांचा वाली कोण?

बुलडाणा शहरातील मोकाट गुरांची वाढतील संख्या लक्षात घेता रस्त्यावर ठिय्या मांडून बसणाऱ्या या मोकाट जनावरांचा वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहन चालकांना वाहन सोडून रस्त्यावरील गुरांना बाजूला करावे लागते.

कारवाईला टाळाटाळ

काही दिवसांपूर्वी नगर पालिकेकडून शहरात मोकाट गुरांना बांधून ठेवण्याबाबत सूचना देण्यात आली होती. त्यानंतर या गुरांच्या मालकांनी आपली गुरे बांधून ठेवली. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. कारवाई होत नसल्याने मालकही आपली गुरे दिवसभर मोकाट सोडून देतात.

Web Title: Drive slowly; Mokat animals grew!