पाच गावांसाठी पिण्याचे टँकर मंजूर
By Admin | Updated: April 10, 2017 23:53 IST2017-04-10T23:53:13+5:302017-04-10T23:53:13+5:30
मेहकर तालुक्यातील गावांचा समावेश.

पाच गावांसाठी पिण्याचे टँकर मंजूर
बुलडाणा : पाणीटंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट जिल्ह्यातील चार गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर करण्यात आले आहे.
मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे, पारडी, अकोला ठाकरे, बोथा व दुर्गबोरी गावांचा समावेश आहे. हिवरा साबळे गावची लोकसंख्या १४४९ असून, गावाकरिता २४ मेट्रिक टन क्षमतेचा एक टँकर दिवसातून दोन फेर्या मारणार आहे. पारडी येथील ११२८ लोकसंख्येसाठी २४ मेट्रिक टन क्षमतेचा एक टँकर दिवसातून तीन फेर्या मारणार आहे. त्याचप्रमाणे अकोला ठाकरे येथील १९00 लोकसंख्येकरिता याच क्षमतेचा एक टँकर दोन फेर्या दिवसातून मारणार आहे. तसेच बोथा येथील ९0२ लोकसंख्येसाठी २४ मेट्रिक टन क्षमतेचा एक टँकर दिवसातून तीन फेर्या मारणार आहे. दुर्गबोरी येथील ११९३ लोकसंख्येकरिता २४ मेट्रिक टन क्षमतेचा एक टँकर दिवसातून दोन फेर्या मारणार आहे. गटविकास अधिकार्यांनी संबंधित गावांना वेळोवेळी भेटी देऊन टँकरच्या खेपांची नोंद तपासावी. ग्रामपंचायतीने नोंद व्यवस्थित घ्यावी. टँकरचे पाणी शुद्ध करूनच पुरविल्या जात असल्याबाबत दक्षता घ्यावी, असे पाणीटंचाई विभागाने कळविले आहे.