पोलिस होण्याचे स्वप्न विरले हवेत
By Admin | Updated: July 18, 2016 22:21 IST2016-07-18T22:21:52+5:302016-07-18T22:21:52+5:30
तालुक्यातील पळसखेड नागो येथील युवकाचे पोलिस खात्यात नोकरी करण्याचे स्वप्न हवेतच विरले असून, भरतीचा सराव करीत असतानाच दुचाकीने धडक दिल्याचे त्याचा

पोलिस होण्याचे स्वप्न विरले हवेत
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. १८ - तालुक्यातील पळसखेड नागो येथील युवकाचे पोलिस खात्यात नोकरी करण्याचे स्वप्न हवेतच विरले असून, भरतीचा सराव करीत असतानाच दुचाकीने धडक दिल्याचे त्याचा मृत्यू झाला. तालुक्यातील दत्तपूरजवळ दुचाकीच्या धडकेत पादचारी युवक ठार व तीन जण जखमी झाल्याची घटना १८ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
तालुक्यातील पळसखेड नागो येथील अंकुश राम मानकर (१८), दिपक दिवाकर बनसोड (१८), सागर मनोहर सुरडकर (२०) व राजदिप केशवराव हेलोडे (२२) हे चार जण पोलिस भरतीसाठी दररोज सायंकाळी धावण्याचा सराव करतात. दररोजप्रमाणे ते १८ जुलै रोजी सायंकाळी पळसखेड नागो येथून दत्तपूरकडे धावत गेले. त्यानंतर दत्तपूरकडून परत चालत येत असताना मागून भरधाव वेगात येणाऱ्या गजानन कारेकर रा.पाडळी यांच्या मोटारसायकलने या युवकांना धडक दिली. त्यामध्ये अंकुश मानकर हा ठार झाला. तर दिपक दिवाकर बनसोड, सागर मनोहर सुरडकर व राजदीप केशवराव हेलोडे हे जखमी झाले आहेत. जखमींना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.