ढाब्यावर साहित्याची तोडफोड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:03 IST2017-08-02T02:03:20+5:302017-08-02T02:03:42+5:30

संग्रामपूर : निपाणा येथील दारुच्या नशेत तर्रर असलेल्या सहा जणांनी ढाबा मालकाच्या भावाला मारहाण करीत  तोडफोड केल्याची घटना ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता संग्रामपूर निपाणा रस्त्यावरील आकाश ढाब्यावर घडली. याप्रकरणी ढाबा मालकाच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Draft material breaks! | ढाब्यावर साहित्याची तोडफोड!

ढाब्यावर साहित्याची तोडफोड!

ठळक मुद्दे एकास मारहाणसहा जणांना अटक

संग्रामपूर : निपाणा येथील दारुच्या नशेत तर्रर असलेल्या सहा जणांनी ढाबा मालकाच्या भावाला मारहाण करीत  तोडफोड केल्याची घटना ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता संग्रामपूर निपाणा रस्त्यावरील आकाश ढाब्यावर घडली. याप्रकरणी ढाबा मालकाच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत ढाबा मालकाचे भाऊ संजय प्रल्हादराव देशमुख (वय ४७) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा भाऊ नीळकंठ देशमुख हा जटाशंकर येथून दर्शन घेऊन परत येत असताना दुपारी २ वाजता दरम्यान करमोडा फाटा येथे त्याला ऋषिकेश सुभाष मोहे, गोपाल रामखन मोहे, गणेश किसन वानखडे यांनी जटाशंकर येथे पोलिसांना नावे का सांगितली, या कारणावरून मारहाण केली.
त्याचवेळी गावातील संतोष रामेश्‍वर मसुरकार, प्रकाश निनाजी कांडेलकर, देवराज टेकाडे, ऋषिकेश सुभाष मोहे, गोपाल रामरतन मोहे, गणेश वानखडे हे सर्व दारु पिलेल्या अवस्थेत हातामध्ये लाठय़ा-काठय़ा घेऊन ढाब्यामध्ये आले. तेव्हा ढाबाचालक संजय देशमुख यांनी वरील सहा जणांना काय झाले, असे विचारले असता, त्यातील संतोष मसुरकर याने नीळकंठ देशमुख यांचे काही एक न ऐकता त्यांना मारहाण केली. त्यानंतर प्रकाश निनाजी कांडेलकर, देवराव नारायण टेकाळे, ऋषीकेश सुभाष मोहे, गोपाल रामरतन मोहे, गणेश किसन वानखडे यांनी संगणमत करून आकाश ढाब्यावरील फ्रीज, काउंटर, शीतपेयाच्या बॉटल्स ताट्यांना लाठय़ा, काठय़ा मारुन ढाब्यातील साहित्याची तोडफोड केली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, अशा आशयाच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिसांनी वरील सहा जणांविरुद्ध कलम १४३, १४७, १४९, ४२७, ४५२, ३२३, ५0४, ५0६, १३५ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला असून, संतोष रामेश्‍वर मसुरकार, प्रकाश निनाजी कांडेलकर, देवराज नारायण टेकाडे, ऋषीकेश सुभाष मोहे, गोपाल रामरतन मोहे, गणेश किसन वानखडे या सहा आरोपींना अटक केली आहे. 
 

Web Title: Draft material breaks!