डोंगर उतारावरील नागरी वस्त्यांना भूस्खलनाचा धोका!

By Admin | Updated: August 4, 2016 01:03 IST2016-08-04T01:03:11+5:302016-08-04T01:03:11+5:30

बुलडाणा नगर प्रशासनाने वेळीच काळजी घेण्याची गरज.

Downtown sloping landslide threatens landslide! | डोंगर उतारावरील नागरी वस्त्यांना भूस्खलनाचा धोका!

डोंगर उतारावरील नागरी वस्त्यांना भूस्खलनाचा धोका!

बुलडाणा, दि. ३ : अजिंठय़ाच्या पर्वत रांगेत एकेकाळी घनदाट वनराईने नटलेल्या टेकडीवरचे हे बुलडाणा शहर आता टेकडीच्याच धोक्याखाली आले आहे. विस्तारामुळे शहरातील शेवटच्या टोकावर मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टी निर्माण झाली आहे. डोंगर उतारावरील या वस्त्यांना पावसाळ्यात भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो.
शहराच्या चारही बाजुंनी डोंगरदर्‍या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांच्या राहण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. जागे अभावी आता तर, लोकांनी थेट टेकड्या कोरून त्यांच्या कपारी मध्ये झोपड्या करून राहण्यास सुरूवात केली आहे. अतवृष्टी व अन्य नैसर्गीक आपत्ती आल्यास या घरांना धोका होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.
शहराच्या सिमारेषेवर जवळपास १0 वस्त्या अशा आहेत की एखादी नैसर्गीक आपत्ती आल्यास येथेही येथील नागरिकांना मोठा धोका होऊ शकते. शहराच्या आजूबाजूला डोंगर दर्‍यामध्ये ज्या वस्त्या आहेत तेथे अती पावसामुळे भुस्सखलन झाल्यास ही घरे दरीमध्ये कोसळण्याची भिती आहे. असे झाल्यास या भागात बचाव पथकाला घटनास्थळावर पोहचणे सुध्दा जिकरीचे होईल.अशी स्थिती या परिसराची आहे.

Web Title: Downtown sloping landslide threatens landslide!