संशय करतो संसाराचा घात
By Admin | Updated: September 21, 2014 00:38 IST2014-09-20T23:39:57+5:302014-09-21T00:38:45+5:30
खामगाव तालुक्यातील परिस्थिती : महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये सहा महिन्यात ६२ तक्रारी.

संशय करतो संसाराचा घात
अनिल गवई / खामगाव (बुलडाणा)
थाटामाटात लग्न आटोपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तालुक्यातील ६२ जणांच्या संसाराची गाडी रुळावरून उतरली. यापैकी तब्बल २९ जणांच्या सप्तपदीची गाठ केवळ संशयीवृत्तीमुळे सैल झाल्याचे चित्र आहे.
वाढत्या घरगुती कलहामुळे कुटुंब व्यवस्था धोक्यात येत असल्याचे लक्षात येताच शासनाने सं पूर्ण राज्यात कलह उद्भवलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उ पक्रमांतर्गत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत स्थानिक शहर पोलिस स्टेशनमध्ये बुलडाणा येथील जीवनधारा शैक्षणिक क्रीडा व बहुउद्देशीय महिला मंडळाला ह्यसमु पदेशन केंद्रह्ण चालविण्यास परवानगी दिली. महिला दिन आणि राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून १0 मार्च २0१४ रोजी या केंद्राचे रितसर उद्घाटन झाले. उद्घाटन झाल्या पासून आजपर्यंतच्या सहा महिन्यांच्या कालावधीत ६२ तक्रारी या केंद्रात दाखल आहेत.
प्राप्त तक्रारींचा निपटारा करताना तब्बल २९ तक्रारी या चारित्र्याच्या संशयावरून असल्याचे वास्तव आहे. तर १४ दाम्पत्यांच्या वादाला मोबाईल कारणीभूत ठरल्याची वस्तुस्थिती आहे. याशिवाय सात दाम्पत्याच्या संसारात दोघांपैकी एकाच्या आईने मिठाचा खडा असल्याची परिस्थिती असून, १0 महिलांनी केवळ आकसापोटी तक्रार दाखल केल्याचे चित्र समोर आले आहे.