शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'समृद्धी'च्या गौण खनिज उत्खननातून ‘डबल प्रॉफिट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 17:48 IST

समृद्धी महामार्गाला मुरूम तर मिळतोच शिवाय जलस्त्रोतांचेही खोलीकरण होत आहे, असा ‘डबल प्रॉफिट’ समृद्धीसाठी लागणाºया गौण खनिजाच्या उत्खननातून साधला जात आहे.  

- ब्रम्हानंद जाधव। बुलडाणा : नागपूर-मुंबई हा समृद्धी महामार्गबुलडाणा जिल्ह्यातून ८७.२९0 कि.मी. अंतराचा जात आहे. त्यासाठी  सध्या कोरड्या पडलेल्या धरण, तलावातून मुरूमाचे उत्खनन केले जात आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाला मुरूम तर मिळतोच शिवाय जलस्त्रोतांचेही खोलीकरण होत आहे, असा ‘डबल प्रॉफिट’ समृद्धीसाठी लागणाºया गौण खनिजाच्या उत्खननातून साधला जात आहे.  नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा व देऊळगाव राजा या तीन तालुक्यातून जात आहे. या समृद्धी महामागार्साठी आवश्यक असणाºया जमीन खरेदी काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात महामार्गाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. परंतू समृद्धी महामार्ग नागरिकांच्या सोयीसाठी असल्याने या कामात अडथळे येऊ नयेत, यासाठी प्रशासनाला सुरूवातीपासूनच तारेवरची कसरत करावी लागली. या कामामध्ये अडथळ्यांचा डोंगर मात्र सदैव येत आहे. जिल्ह्यातून महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर त्यासाठी लागणाºया गौण खनिजाकरीता प्रशासनाला अनेक अडचणीला तोंड द्यावे लागले. ई क्लास जमीन, धरण, तलाव या ठिकाणावरून मुरूमाचे उत्खनन करण्यास सुरूवातीला स्थानिक लोकांनी विरोधही केला. मात्र सध्या मेहकर तालुक्यातून समृद्धी महामार्ग जात असलेल्या परिसरातील गावांमधून मुरूमाची वाहतूक जोरात सुरू आहे. कोरडे पडलेले धरण, तलाव, नदी, याठिकाणावरून महामार्गाच्या कामासाठी मुरूमाचे उत्खनन केल्या जात असल्याने डबल फायदा यातूनसाधला जात आहे. महामार्गाच्या कामासाठी लागणाºया मुरूमाची गरज भागविल्या जात आहे. तर दुसरा फायदा म्हणजे ज्या ठिकाणी उत्खनन होत आहे, त्या धरण, नदी किंवा तलावाचे चांगल्या प्रकारे खोलीकरण होत आहे. भविष्याच्या दृष्टीने जलस्त्रोतांचे हे खोलीकरण अत्यंत फायद्याचे ठरणार आहे.दिवस-रात्र मुरूमाची वाहतूक मेहकर तालुक्यात सध्या समृद्धी महामार्गाच्या कामाला वेग आला आहे. महामार्गाच्या कामासाठी लागणाºया मुरूमाची दिवस-रात्र वाहतूक सुरू आहे. शहापूर, ऊमरा देशमुख, आंध्रुड, गोहोगाव दांदडे शिवारातून धरण, नदी, तलावातील मुरूमाचे उत्खनन सुरू आहे. त्यासाठी छोटी-मोठी शेकडो वाहने कामाला लागले असून दिवसा व रात्रभरही मुरूमाची वाहतूक केली जात आहे. फायद्यापाठोपाठ तोटेहीमहामार्गासाठी लागणाºया मुरूम उत्खननातून फायद्यापाठोपाठ तोटेही दिसून येतात. ज्या ठिकाणी मुरूम उत्खनन केल्यास अडचणी येऊ शकतात, अशा ठिकाणीही उत्खनन होत आहे, मध्यंतरी तशा तक्रारी सुद्धा मेहकर तालुक्यातून समोर आल्या. मुरूमाची वाहतूक करणाºया जड वाहनाने इतर रस्त्यांचीही वाट लागली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग