बर्ड फ्लूला घाबरू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:39 IST2021-01-16T04:39:05+5:302021-01-16T04:39:05+5:30
बुलडाणा : पक्ष्यांवर घोंघावत असलेल्या बर्ड फ्लूच्या संकटाला न घाबरता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासन नियमितरीत्या करीत आहे. जिल्ह्यात ...

बर्ड फ्लूला घाबरू नका
बुलडाणा : पक्ष्यांवर घोंघावत असलेल्या बर्ड फ्लूच्या संकटाला न घाबरता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासन नियमितरीत्या करीत आहे. जिल्ह्यात सध्या तरी कुठलाही पक्षी बर्ड फ्लूने बाधित नाही. या रोगापासून घाबरून जाण्याची गरज नाही. पूर्ण शिजविलेले चिकन व उकडलेली अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लू होत नाही, हा संदेश देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शिजविलेले व तयार केलेले चिकन, उकडलेली अंडी खाऊन प्रात्यक्षिक केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुनील शेळके, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. जी बोरकर, नायब तहसीलदार पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ठाकरे, साहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सोळंके, आदींनी शिजविलेले चिकन व अंडी खाऊन बर्ड फ्लूला न घाबरण्याचे आवाहन केले.
जनतेने न घाबरता काळजी घेत पूर्ण शिजविलेले चिकन व उकडलेली अंडी खावीत. कुठल्याही अफवांना बळी पडू नये. या प्रात्यक्षिकातून पशुसंवर्धन विभागाने जनतेला न घाबरता सावधगिरी बाळण्याचा संदेश दिला. डॉ. बोरकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. याप्रसंगी पशुधन विकास अधिकारी डॉ. पाटील, डॉ. चोपडे, डॉ. धीरज सोनटक्के, पशुधन विकास अधिकारी जिल्हा परिषद डॉ. दिवाकर काळे, बायएफ व पोल्ट्री फॉर्मचे डॉ. रवींद्र उगले, पशुधन विकास अधिकारी डॉ. वैशाली उईके, डॉ. ज्योती गवई, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.