मॉलला परवानगी देऊ नका, किराणा व्यापारी असोसिएशनची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:29 IST2021-01-15T04:29:10+5:302021-01-15T04:29:10+5:30
किराणा व्यापारी असोसिएशनद्वारे देण्यात आलेल्या निवेदनात चिखलीसारख्या लहान शहरात मॉल सुरू केल्यास अनेक सुशिक्षित, बेराेजगार किरकोळ व्यापारी यांच्यासह त्यांच्या ...

मॉलला परवानगी देऊ नका, किराणा व्यापारी असोसिएशनची मागणी
किराणा व्यापारी असोसिएशनद्वारे देण्यात आलेल्या निवेदनात चिखलीसारख्या लहान शहरात मॉल सुरू केल्यास अनेक सुशिक्षित, बेराेजगार किरकोळ व्यापारी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे चिखली शहरात मॉलला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांच्या वतीने त्यांचे पती कुणाल बोंद्रे यांनी हे निवेदन स्वीकारले. न.प. प्रशासन व्यापारी असोसिएशनच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्थानिक व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वास दिला. यावेळी किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल शेटे, उपाध्यक्ष किरण पवार, प्रसिद्धिप्रमुख अमोल जोशी, गोपाल खत्री, निलेश इंगळे, राधाकिसन भुतडा, किरण जैन, सन्नी भोजवानी, प्रेमराज वाळेकर, कुणाल पंजवाणी, कैलास वाणी आदी किराणा व्यापारी उपस्थित होते.