डॉक्टरांचे ‘पेन डाऊन’ आंदोलन
By Admin | Updated: June 7, 2017 00:51 IST2017-06-07T00:51:48+5:302017-06-07T00:51:48+5:30
खामगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन च्यावतीने दिल्ली येथे आयोजित धरणे आंदोलनास पाठिंबा म्हणून शहरात मंगळवारी डॉक्टरांनी ‘पेन डाऊन’ आंदोलन केले.

डॉक्टरांचे ‘पेन डाऊन’ आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : डॉक्टर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन च्यावतीने दिल्ली येथे आयोजित धरणे आंदोलनास पाठिंबा म्हणून शहरात मंगळवारी डॉक्टरांनी ‘पेन डाऊन’ आंदोलन केले. या आंदोलनात शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉक्टर सहभागी झाले होते.
आंदोलनात डॉक्टरांनी सकाळच्या सत्रात रुग्ण तपासणी बंद ठेवली. पीसीपीएनडीटी व क्लिनिकल एस्ट ॅब्लिशमेंट कायद्यात सुधारणा करावी, वैद्यकीय लेखनिक चुकांसाठी त्रुटींसाठी फौजदारी कार्यवाही करू नये, ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत कमाल भरपाईची रक्कम मर्यादी ठरवावी, मंत्री गटाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्या, वेगवेगळ्या उपचार पद्धतीचे अशास्त्रीय मिश्रम करू नये, आदी मागण्यांसाठी सदर आंदोलन करण्यात आले. यामध्ये शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टरांचा सहभाग असल्याची माहिती डॉ. अशोक गायकवाड यांनी दिली आहे.