पिंपळनेर-लोणार मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत डॉक्टरचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 11:23 IST2021-08-14T11:22:46+5:302021-08-14T11:23:01+5:30
Accident News : पहाटे ६ वाजेदरम्यान ते मॉर्निंग वॉक करत असताना हा अपघात घडला.

पिंपळनेर-लोणार मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत डॉक्टरचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार: तालुक्यातील पिंपळनेर गावानजीक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने डॉ. सुरेश फकीरा सानप (५२) यांचा मृत्यू झाला. पहाटे ६ वाजेदरम्यान ते मॉर्निंग वॉक करत असताना हा अपघात घडला. प्रकरणी पोलिसानी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. सुरेश फकीरा सानप (रा. पिंपळनेर) हे १३ ऑगस्ट रोजी साखील पिंपळनेर-लोणार मार्गावर पानस शिवारात मॉर्निंग वॉक करत असताना लोणाकडून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाल्यामुळे स्थानिकांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी त्यांचे चुलत भाऊ संजय देवराव सानप यांनी लोणार पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल रामकिसन गीते हे करीत आहेत.