आशांची दिवाळी अंधारात; मानधन नाही
By Admin | Updated: October 15, 2014 00:41 IST2014-10-14T23:20:50+5:302014-10-15T00:41:57+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील आशा वर्कर मागील चार महिन्यांपासून मानधनापासून वंचित.

आशांची दिवाळी अंधारात; मानधन नाही
बुलडाणा : आशा वर्कर मागील चार महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. दिवाळी तोंडावर आली असतानाही मानधन न मिळाल्याने त्यांच्यासमोर गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. मानधन न मिळाल्यास दिवाळी अंधारात जाण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. गरोदर महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात नेणे, कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहित करणे यांसह लसीकरण व अन्य कार्यक्रम राबविण्यात महत्त्वाची भूमिका आशा वर्कर पार पाडता त. त्यांना मागील चार महिन्यांपासून कामाचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे मानधन त्वरित द्यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आशा वर्कर संघटनेने दिला आहे.