दिवाळी अन् दिवाळं

By Admin | Updated: September 14, 2014 00:44 IST2014-09-14T00:44:15+5:302014-09-14T00:44:15+5:30

राजकीय दिवाळीत खर्‍या अर्थाने आता फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे.

Diwali and Diwali | दिवाळी अन् दिवाळं

दिवाळी अन् दिवाळं

राजेश शेगोकार / बुलडाणा
दिवाळी हा सण जातीभेदाच्या सीमा ओलांडून देशभर साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश, उत्साह.अशी दिवाळी अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपली असताना आता राजकारणाचा दिवाळसण सुरू झाला. याच दिवाळी शब्दामध्ये ह्यदिवाळंह्ण हा शब्दही लपला असून, येणारी दिवाळी राजकीय क्षेत्रात दिवाळी अन् दिवाळं याचे एकाच वेळी प्रत्यंतर देणारी ठरणार आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. उमेदवारांची यादी अंतिम टप्यात आहे. उभेच्छुक कामाला लागले आहेत, त्यामुळे राजकीय दिवाळीत खर्‍या अर्थाने आता फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. या राजकीय दिवाळीत बुलडाणा मतदारसंघात काँग्रेस येत्या दिवाळीचा फटाका थेट ह्यदिल्लीवरूनह्ण आणणार असल्याचे आवाज आताच ऐकू येऊ लागले आहेत. तसं पाहिलं तर या म तदारसंघात दिवाळी साजरी करण्यासाठी काँग्रेसजवळ अनेक फटाके आहेत; मात्र त्यांचा आवाज सध्या दबला आहे. एकदा फटाका कोणता हे ठरले की मग उरलेले सारे फटाके कधी फुटतील याचा नेम नाही. निकालानंतरच समजते कोणता फटाका कुठे फुटला अन् आवाज कुठून निघाला ते. तीच गोष्ट यावेळी सेनेची आहे. अनेक लवंगी फटाके सध्या आवाज करीत आहेत. ते कधीही वाजतात. फक्त एकाच वेळी वाजले तर लवंगी फटाकेही आवाज करतात हे त्यांना समजले, तर काँग्रेस अन् सेना सारखीच होईल. या मतदारसंघात राष्ट्रवादी अन् भाजपा दळणात दळण करून मोकळे होतात इ तकाच काय तो फरक.
चिखली यावेळी भाजपाकडे, तर दिवाळीसाठी मोठी बारूद असून, अनेक नव्या फटाक्यांची आवक सुरूच आहे. स्वाभिमानीवालेही भाजपाच्या अंगणात जाऊन फटाके लावत आहे, अन् काँग्रेसमधील अनेक फटाके आपणच ह्यबॉम्बह्ण आहोत, असे कार्यकर्त्यांना पटवून देत आहेत. त्यामुळे येथे भाजपा असो, की काँग्रेस खर्‍या ह्यटाइम बॉम्बह्ण ची टिकटिक सुरू झालेली नाही. चिखलीसारखीच परिस्थिती जळगाव जामोदमध्ये काँग्रेसची आहे. काँग्रेसमध्ये सर्व नव्या-जुन्या फटक्यांमध्ये बारूद भरली आहे. येथे फटाका कोणत्या समाजाच्या दारात फोडायचा याचाच मुहूर्त काढणे सुरू आहे. भाजपाने आता पासूनच टिकल्या फोडण्यास सुरुवात केली असून, हळूहळू बॉम्ब फोडण्यापर्यंत जाण्याचे त्यांचे प्लॅनिंग दिसत आहे. खामगावात दरवर्षी भाजपा नवा फटका बाजारात आणते. निकाल आले की तो फटका फुस्स होता हे दिसते त्यामुळे यावर्षी आवाज कोणाचा, हे अजून बाहेर आलेच नाही. लोकांना जे वाटते ते बोलत आहेत त्यामुळे भाजपा कोणता ह्यटाइमबॉम्बह्ण लावते, यावरच दिवाळी कोणाची याची सूत्रे ठरतील. मेहकरमध्ये राष्ट्रवादीचे फटाके बाजूला ठेवा, आता काँग्रेसचा आवाज होऊ द्या म्हणून मागणी सुरू आहे. दोन-चार दिवसात कोणाचा फटाका वाजेल, हे ठरेल; पण तिकडे शिवसेनेलाही महायुतीमधून ह्यफटाकेह्ण लागत आहे. सिंदखेडराजामध्ये दिवाळी कधी होते, हे कोणालाच समजत नाही त्यामुळे राष्ट्रवादी असो की काँग्रेस शेवटपर्यंत सारेच दिवाळी आली दिवाळी आली करीत राहतात अन् तेच तेच फटाके फोडून मोकळे होतात. राहता राहिला मलकापूर मतदारसंघ. यावर्षी तर भाजपा मोदी बॉम्ब घेऊनच फिरत आहे. काँग्रेसचा मात्र हा घेऊ की तो घेऊ, असा गोंधळ असल्याने ह्यवातह्ण दिल्लीवरूनच लागेल. अशी परिस्थिती सर्व जिल्ह्यात आहे, भारिप-बमसने खामगाव-जळगावात बारूद घेऊन ठेवली आहे. मनसेने इंजीन भरून फटाके आणले; पण बुलडाणा, जळगाव, सिंदखेडराजातच वाटणार असल्याचीही चर्चा आहे. अजून लहान-मोठे पक्षही आपापल्या परीने दिवाळी साजरी करण्यासाठी तजवीज करीत असल्याने दिवाळीचा बार चांगलाच उडणार, हे तितकेच खरे. फक्त दिवाळं कोणाचे हाच प्रश्न आहे. प्रश्नाच्या उत्तराचा अंदाज पितृपक्ष सं पला की येईलच. सध्या तरी फक्त ह्यआवाजह्ण ऐकणे एवढेच मतदारांच्या हाती आहे.

Web Title: Diwali and Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.