पत्नीला रस्त्यात अडवून मागितला घटस्फोट! पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
By अनिल गवई | Updated: June 6, 2024 19:04 IST2024-06-06T19:03:45+5:302024-06-06T19:04:28+5:30
खामगाव: रस्त्यात अडवून एका विवाहितेला घटस्फोटासाठी धमकी दिली. ही घटना अंजुमन हायस्कूल जवळ घडली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी ...

पत्नीला रस्त्यात अडवून मागितला घटस्फोट! पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
खामगाव: रस्त्यात अडवून एका विवाहितेला घटस्फोटासाठी धमकी दिली. ही घटना अंजुमन हायस्कूल जवळ घडली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी पतीसह तिघां विरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, स्थानिक मिल्लत कॉलनीतील शाहीर परवीन इलियास अहमद ३० ही विवाहिता ८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता अंजुमन हायस्कूल जवळील रस्त्यावरून जात असताना इलियास अहमद रियाज अहमद ३५ याने रस्त्यात अडवून शिविगाळ केली तर. एजाज अहमद रियाज अहमद ३९ रा. बोरीपुरा, डोबाळवेस आणि सय्यद रिजवान सय्यद सादिक ४५ रा. जळगाव खांदेश यांनी तक्रार मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप ५ जून रोजी दिलेल्या तक्रारीत केला. या तक्रारीवरून शहर पोलीसांनी उपरोक्त तिघांविरोधात भादंवि कलम ३४१, २९४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ गजानन पाटील करीत आहेत.