जिल्हा स्त्री रुग्णालय सहा महिन्यात कार्यान्वित होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:45 IST2017-08-02T23:43:33+5:302017-08-02T23:45:43+5:30

बुलडाणा : ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ठप्प झाली असून, सर्वसामान्यांची होणारी होरपळ लक्षात घेता बुलडाण्यातील स्त्री रुणालय सहा महिन्यांत कार्यान्वित करण्यात येईल.

District Women Hospital to be implemented in six months! | जिल्हा स्त्री रुग्णालय सहा महिन्यात कार्यान्वित होणार!

जिल्हा स्त्री रुग्णालय सहा महिन्यात कार्यान्वित होणार!

ठळक मुद्देआ. सपकाळ यांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांची माहितीजिल्हा सामान्य रुग्णालय व मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात वाढीव खाटांना मंजुरीसर्वसामान्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ठप्प झाली असून, सर्वसामान्यांची होणारी होरपळ लक्षात घेता बुलडाण्यातील स्त्री रुणालय सहा महिन्यांत कार्यान्वित करण्यात येईल. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय व मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, वाढीव खाटांची मंजुरी देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.
आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. वैद्यकीय अधिकाºयांची मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदे, प्रसूतीसाठी महिला रुणांना अकोला व औरंगाबाद येथे संदर्भित करण्याचे वाढते प्रमाण, मुदतबाह्य औषधांचे वितरण, बंद पडलेली सिटी स्कॅन मशीन व लिफ्ट, रुग्णालयातील दलालांचे वाढते प्रस्थ इत्यादी विविध विषयांमुळे बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय व एकूणच आरोग्य विभाग सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झालेला आहे. नागरिकांच्या तक्रारीकडे शासन पातळीवर होणारे दुर्लक्ष लक्षात घेता, आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी १ आॅगस्ट रोजी विधानसभेत अर्धा तास चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. यावेळी बोलताना आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाची विदारक स्थिती सभागृहासमोर विशद केली. या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालय व मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षणीय असल्याचे सांगून, या दोन्ही ठिकाणी वाढीव खाटांचा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच संस्थात्मक प्रसूतीचे महत्त्व लक्षात घेता, महिला रुग्णांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले स्त्री रुग्णालय सर्व सुविधांसह सहा महिन्यांत कार्यान्वित करण्यात येणार असल्याची शाश्वती दिली.

जिल्हा शल्य चिकित्सकांची बदली
आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभार व गलथानपणाबद्दल बोलताना डॉ. दीपक सावंत यांनी ही गंभीर बाब असून, जिल्हा शल्य चिकित्सकांची बदली करण्यात येत असल्याचे सभागृहास सांगितले.

Web Title: District Women Hospital to be implemented in six months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.