जिल्ह्याला मिळणार काेराेना लसीचे १९ हजार डाेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:28 IST2021-01-14T04:28:50+5:302021-01-14T04:28:50+5:30
बुलडाणा : काेराेना लसीची प्रतीक्षा संपली असून, जिल्ह्याला १९ हजार डाेस मिळणार आहेत. जिल्ह्यात १६ जानेवारी राेजीच सात केंद्रांमध्ये ...

जिल्ह्याला मिळणार काेराेना लसीचे १९ हजार डाेस
बुलडाणा : काेराेना लसीची प्रतीक्षा संपली असून, जिल्ह्याला १९ हजार डाेस मिळणार आहेत. जिल्ह्यात १६ जानेवारी राेजीच सात केंद्रांमध्ये लसीकरण करण्याचे नियाेजन प्रशासनाने केले आहे.
काेराेनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही आराेग्य विभागाने तयारी पूर्ण केली आहे. राज्यभरात डाेसचे वितरण हाेणार असून, अकाेला विभागातून बुलडाणा जिल्ह्याला सर्वाधिक १९ हजार डाेस मिळाले आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्यात डाॅक्टर आणि आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. शासकीय आराेग्य कर्मचाऱ्यांबराेबरच खासगी रुग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आराेग्य कर्मचाऱ्यांची नाेंदणी करण्यात येत आहे. १३ जानेवारीपर्यंत जवळपास १४ हजार कर्मचाऱ्यांनी नाेंदणी केली आहे. पहिल्या टप्प्यात या १४ हजार कर्मचाऱ्यांना डाेस देण्याचे नियाेजन आराेग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सात केंद्रांवर १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी १३ जानेवारी राेजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियाेजन करण्यात आले आहे. जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांच्या अधिनस्थ हे १९ हजार डाेस राहणार असून, गरजेनुसार त्याचा वापर करण्यात येणार आहे.
या केंद्रावर हाेणार लसीकरण
जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, मलकापूर, बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा आणि मेहकर या केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे.
दरराेज ७५ ते १०० कर्मचाऱ्यांना देणार लस
नाेंदणी केलेल्या ७५ ते १०० आराेग्य कर्मचाऱ्यांना दरराेज लस देण्याचे नियाेजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अकाेला येथून व्हॅनने १४ जानेवारीपर्यंत लस येणार आहे. आवश्यक त्या तापमानात साठवून ठेवण्यात येणार असून, गरजेनुसार वितरण करण्यात येणार आहे.