जिल्हा पुरवठा कार्यालयास दोन हजारांचा दंड

By Admin | Updated: January 3, 2017 01:28 IST2017-01-03T01:28:48+5:302017-01-03T01:28:48+5:30

माहिती अधिकारार्तंगत माहिती न देणे भावले.

District Supply Office sentenced to two thousand | जिल्हा पुरवठा कार्यालयास दोन हजारांचा दंड

जिल्हा पुरवठा कार्यालयास दोन हजारांचा दंड

नांदुरा, दि. 0२- बुर्टी ता.नांदुरा येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानचे जप्त केलेल्या रेकॉर्डची माहिती येथील शिवाजी पाटील यांनी ५ फेब्रुवारी २0११ रोजी प्रथम अपिलीय अधिकारी प्रभाकर बेंडे यांचेकडे माहिती अधिकार कायदा २00५ अंतर्गत मागितली होती त्यावर अमरावती माहिती आयुक्त यांनी ३ डिसेंबर २0१६ रोजी आदेश निर्गमित करीत बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीचा अधिकार देत अपिलार्थीस दोन हजार रुपयेनुकसान भरपाईचा आदेश दिला.
माहिती अधिकार कायदा २00५ अंतर्गत बुर्टी ता.नांदुरा येथील शिवाजी पाटील यांनी अपिलीय अधिकारी जिल्हापुरवठा कार्यालय बुलडाणा यांचेकडे बुर्टी ये थील स्वस्त धान्य दुकानाचे जप्त केलेल्या रेकॉर्डची माहिती मागितली होती. ही माहिती मुदतीत न मिळाल्याने १५ मार्च २0११ रोजी अपील दाखल केले. त्यानंतरही शिवाजी पाटील यांना माहिती मिळाली नाही. शेवटी ३ मे २0११ रोजी त्यांनी माहिती आयुक्त अमरावती यांचेकडे माहिती अधिकारांतर्गत अर्ज दाखल केला होता. त्यावर आदेश देत आयुक्तांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या २८ नोव्हेंबर २0११ रोजी निर्णय दिला. त्यानंतरही माहिती न मिळाल्याने त्यांनी २५ मार्च २0१६ ला दुसरे अपील दाखल केले. या प्रकरणात अपिलार्थीस तब्बल चार वर्षे उलटूनही माहिती न मिळाल्याने माहिती अधिकार कायदा २00५ कलम १९/(८) (खा) नुसार कार्यवाही करीत माहिती आयुक्त वसंत पाटील यांनी ३ डिसेंबर २0१६ रोजी आदेश पारित करीत अपिलार्थीस माहिती पुरविण्याबाबत चौकशीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देत अपिलार्थी पाटील यांना नुकसान भरपाईपोटी पंधरा दिवसांत दोन हजार रुपये देण्याचा आदेश दिला.

तब्बल चार वर्षे उलटूनही माहिती मिळाली नसून, आयुक्तांच्या आदेशालाही केराची टोपली दाखविली आहे. या प्रकरणात आता उच्च न्यायालयात जाणार आहे.
- शिवाजी पाटील, अपिलार्थी

Web Title: District Supply Office sentenced to two thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.