शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

खामगाव बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेची जिल्हा उप निबंधकांकडून चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 1:57 PM

कृउबासच्या सर्वसाधारण सभेच्या चौकशीमुळे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

खामगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीत ३ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक सोमवारी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत धडकले. त्यांनी विरोधी सदस्यांसोबतच सभापतींच्या गटाचीही बाजू जाणून घेतली. कृउबासच्या सर्वसाधारण सभेच्या चौकशीमुळे स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ३ फेब्रुवारी रोजी पार पडलेली सर्वसाधारण सभा ही नियमबाह्य होती. या सभेतील विषय सुचीवर महाराष्ट्र शेतीच्या उत्पन्नाची खरेदी-विक्री (नियमन व विकसन) १९६७ चे नियम १०८ (२) नुसार सह्यांचे अधिकार प्रदानकरणेबाबत हा विषय होता. या विषयाच्या बाजूने मतदानाची उपसभापती निलेश दीपके, संचालक श्रीकृष्ण टिकार, संजय झुनझुनवाला, विवेक मोहता, राजेश हेलोडे यांनी मागणी केली. त्यावेळी सभापती सभेतून निघून गेले होते. सभानियमांचा भंग केल्याप्रकरणी सभापती व सचिव यांची तातडीने सक्षम अधिकारीमार्फत समयबध्द कालावधीमध्ये चौकशी व्हावी अशी मागणी बाजार समितीचे उपसभापती निलेश दीपके, संचालक श्रीकृष्ण टिकार, संजय झुनझुनवाला, विवेक मोहता, राजेश हेलोडे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांच्याकडे केली होती.जिल्हा उपनिबंधकांचे कानावर हात!स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्वसाधारण सभेच्या चौकशीसंदर्भात जिल्हा उपनिबंधक महेश चव्हाण यांनी यासंदर्भात माहिती देण्याचे टाळले. चौकशी ही आपल्या नियमित कामकाजाचा एक भाग असल्याचे सांगत याप्रकरणी काहीही ऐकूण घेण्यास नकार दिला. कृउबासमधील चौकशी प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांची भूमिका एकप्रकारे कानावर हात ठेवल्यासारखी असल्याचीच चर्चा कृउबास वर्तुळात होती.कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ विरूध्द ४ असे संख्याबळ आहे. संख्याबळ आमच्या बाजूने असल्याने सभापतींनी बहुमत नसताना ठराव लिहीणे गैरकायदेशीर आहे. सभापतींच्या गैरप्रकाराची चौकशी सुरू असल्याने त्यांच्याकडील सभेचे कामकाज काढण्याची आपली मागणी आहे.- श्रीकृष्ण टिकारसंचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, खामगाव.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज नियमानुसार करण्यात आले. सभेतील ठरावाच्या चौकशीच्या अनुषंगाने सोमवारी जिल्हा उपनिबंधक कृषी उत्पन्न बाजार समितीत आले. त्यांनी आमची आणि विरोधी सदस्यांची बाजू ऐकूण घेतली.- संतोष टालेसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा